मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देणारा राज्यातील पहिला पत्रकार

05 May 2020 17:11:50
कोरोना ( कोविड-१९) विरोधी लढ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरीव आर्थिक मदत श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमामधून पाठवण्याचे कार्य मिलिंद सदाशिव चवंडके या ज्येष्ठ पत्रकाराने सहकारी विश्वस्तांसह प्राधान्याने केले आहे. देवस्थानतर्फे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या २१ लाखांच्या धनादेशवर अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्यासह विश्वस्त म्हणून मिलिंद चवंडके यांची स्वाक्षरी असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरीव योगदान देणारे ते राज्यातील पहिले पत्रकार ठरले आहेत.
 
milindchavandke_1 &n
 
नवनाथांमधील प.पू. श्रीकानिफनाथ यांची श्रीक्षेत्र मढी येथे दहाव्या शतकातील संजीवन समाधी आहे. या देवस्थानचा कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट या नावे १९५४ सालचा नोंदणीकृत ट्रस्ट (नोंदणी क्रमांक : ई ८९/१९५४) आहे. या ट्रस्टतर्फे प्रति वर्षी ध्वजदिन निधीसाठी ११ हजार रूपये दिले जातात. मात्र ट्रस्टच्या इतिहासात महाराष्ट्र सरकारला मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २१ लाखांची रक्कम पहिल्यांदाच देण्यात आली आहे. देवस्थानचे उपाध्यक्ष सुनिल सानप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख देण्याचा विषय मांडला. महाराष्ट्रभरातील भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेले पैसे महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्रवासियांसाठी देण्याचे राष्ट्रकार्य घडले. या कार्याचे महाराष्ट्रभरातून भरभरून कौतुक होत आहे.
 
धर्मदाय उपायुक्त श्रीमती हि.का. शेळके यांनी या देवस्थानमधील सह्यांचे अधिकार देवस्थानचे अध्यक्ष श्री.शिवशंकर राजळे व विश्वस्त श्री.मिलिंद चवंडके यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. धर्मदाय उपायुक्तांच्या आदेशाचे स्वागत देवस्थानमधील उपाध्यक्ष सुनिल सानप व विश्वस्त अप्पासाहेब मरकड यांच्यासह कर्मचारी वृंद, ग्रामस्थ व नाथभक्तांनी केले. राजळे व चवंडके यांनी सानप व अप्पासाहेब मरकड यांच्यासह कर्मचारी वृंदांच्या खंबीर सहकार्याने पारदर्शी कार्याचा विडा उचलला.
 
Nathprasad_1  H
 
देवस्थानचे कारभारी या नात्याने प्रामाणिकपणे, श्रध्देने व विश्वासपूर्ण कार्य करत या चौघांनी अल्पावधीतच वेगळेपणाचा ठसा उमटवला. गुढीपाडव्याची महापूजा करण्याचा मान विश्वस्तांचा असूनही शिवशंकर राजळे, सुनिल सानप, मिलिंद चवंडके व अप्पासाहेब मरकड या चारही विश्वस्तांनी तालुका व जिल्हा प्रशासनाच्या कोरोना लढ्यासंदर्भातील आदेशांचे तंतोतंत पालन करत ही महापूजा पुजा-यांकडून करवून घेत जिल्ह्यासमोर सर्वप्रथम आदर्श ठेवला. देवस्थानच्या इतिहासात प्रथमच विश्वस्तांनी महापूजेचा मान स्वतःकडे न घेता पुजा-यांना देण्याची घटना घडली. सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून विश्वस्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थ व भाविकांसह प्रशासनानेही कौतुकच केले.
 
सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेकांची उपासमार होत आहे, हे पत्रकार म्हणून वावरताना मिलिंद चवंडके यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आपले विश्वासू विश्वस्त सहकारी शिवशंकर राजळे, सुनिल सानप, अप्पासाहेब मरकड व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वास्तव मांडले. सामाजिक सद् भावनेतून भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. देवस्थानमधील कर्मचारी वृंद सामाजिक अंतराचे भान ठेवत अन्नदान सेवेसाठी सज्ज झाले. हाॅस्पीटल्स्, पोलिस स्टेशन्स्, रस्तोरस्ती ड्युटी बजावणारे पोलिस कर्मचारी, पायी निघालेले प्रवासी, ऊसतोडणी मजूर, रस्त्यालगतच्या आडोशाला बसलेले निराधार, काही दिवसांसाठीच पाल ठोकून मुक्कामी राहिलेली भटक्या समाजाची कुटूंबे, गोर-गरिब-गरजवंत अशा सर्वांपर्यत नाथप्रसाद पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू झाला. नाथप्रसाद हाती घेताना बा कान्होबा तुझी अशीच किरपा -हाऊ दे... असे शब्द ऐकू येऊ लागल्याने प्रसाद वाटप सेवा करणारे देवस्थानचे कर्मचारी भारावून गेले. देवस्थानच्या परिसरात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणे, औषध फवारणी करणे ही सामाजिक सेवा देवस्थानकडून तातडीने करण्यात आली.
 
Cheque_1  H x W
 
श्रीक्षेत्र देवगड येथील ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी लाॅकडाऊनमध्ये सुरू असलेल्या देवस्थानच्या सामाजिक कार्याचे भ्रमणध्वनीवरून खास कौतुक करताना मिलिंद चवंडके यांना गरजू गोशाळांना चारा पुरवण्याचे सुचविले. शासकिय अनुदान वा मदतीचा ओघ नसलेल्या गोशाळा निवडून चारा पुरवण्याचाही निर्णय शिवशंकर राजळे, सुनिल सानप, अप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके या कार्यरत विश्वस्तांनी लगेचच घेतला. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड व विश्वस्त अप्पासाहेब मरकड यांनी दर्जेदार चारा खरेदी केली. विश्वस्त मिलिंद चवंडके यांनी गोशाळेत जाऊन गोमातांची पहाणी करत चा-याची गरज जाणून घेतली. गोमातांसाठी श्रीकानिफनाथांनी हा चारारूपी नाथप्रसाद पाठवण्याचा आदेश दिलाय, असे चवंडके यांनी गोशाळा चालकांना सांगताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. चारा वाटप सेवेत देवस्थानचे कर्मचारी संतोष मरकड व अविनाश मरकड सहभागी झाले.
 
देवस्थानकडून पुरवण्यात येणा-या नाथप्रसादाच्या पाकिटावरील मजकूर लक्षवेधक ठरलाय. जेथे आहात तेथेच राहून जप, ध्यान, अनुष्ठान करत जीवनाचा आनंद लुटण्याची सुसंधी मिळवा. मनःशांती अनुभवा. देशासमोरील कोरोनाचे संकट घालवण्यासाठी नाथांना प्रार्थना करा, हा समाजप्रबोधन करणारा मजकूरही मिलिंद चवंडके यांच्या सिध्दहस्त लेखनीतूनच साकारला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघकार्यात बालस्वयंसेवक म्हणून सहभागी झालेल्या मिलिंद चवंडके यांनी विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता मंच, समरसता साहित्य परिषद, विश्वमंगल गोग्राम यात्रा, भारत भारती, वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, रूग्णोपयोगी साहित्य केंद्र, स्वदेशी जागरण मंच अशा संघ परिवारातील विविध आयामांमध्ये दायित्व सांभाळले आहे. त्यातून मिलिंद चवंडके यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली.
 
निर्व्यसनी व शुध्द शाकाहारी असलेल्या मिलिंद चवंडके यांचा अध्यात्म, मराठी साहित्य व इतिहास संशोधन हा आवडीचा प्रांत. अध्यात्मिक पत्रकारितेचा अनोखा वसा गेल्या २७ वर्षांपासून घेतलेल्या व सामाजिक बांधिलकीची उत्तम जाणिव असलेल्या मिलिंद चवंडके यांना श्रीकानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिल सानप, विश्वस्त अप्पासाहेब मरकड, मढीच्या सरपंच श्रीमती रखमाबाई मरकड, उपसरपंच सौ. मिनाबाई आरोळे, देवस्थानचे माजी अध्यक्ष सचिन मरकड, डाॅ. रमाकांत मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, बबन मरकड, रविंद्र आरोळे, भिमराज मरकड गुरुजी, बाळासाहेब भानुदास मरकड, विष्णु मरकड, हरीश्चंद्र मरकड यांच्यासह देवस्थानमधील मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड तसेच संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड या कर्मचारी वृंदांची व नाथांवर निस्सीम भक्ती असलेल्या ग्रामस्थांची मनापासून साथ लाभली.
 
यामुळे लाॅकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सामाजिक सेवा तालुक्यात सर्वप्रथम उपलब्ध करून देण्याचा सन्मान श्रीकानिफनाथ देवस्थानला मिळवता आला. महाराष्ट्रभरातील भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेले पैसे महाराष्ट्रासाठी सत्कारणी लागले. याबद्दल प्रतिक्रिया देताना मिलिंद चवंडके म्हणाले, लाॅकडाऊन कालावधीत देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेत सामाजिक सेवेत सहभाग घेतला. आत्मविश्वासाने नियोजन केल्यास आपत्तीवर मात करणे शक्य होते, हे प्रत्ययास आले. स्वदेशीचा स्वीकार करणे काळाची गरज आहे हे जाणवले. अधिक प्रयत्नपूर्वक जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन व गोसंवर्धन करत जैविक शेतीकडे वाटचाल करणे मानवीहिताचे ठरणार, हेही स्पष्ट झाले.
 
सामाजिक व राष्ट्रीय कार्यात जिल्ह्यामध्ये अग्रेसर ठरलेल्या श्रीकानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्तपदाची धुरा समर्थपणे सांभाळत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद चवंडके यांनी अखिल पत्रकारांचीच मान उंचावणारे कार्य केले आहे. जीवनात अध्यात्मिक अधिष्ठान असलेला पत्रकार देवस्थानच्या विश्वस्तपदी असणे देवस्थानच्या व राष्ट्राच्या हिताचे ठरते, हे त्यांनी आपल्या कार्यामधून दाखवून दिले आहे.
Powered By Sangraha 9.0