जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करून रेतिघाट सुरू करा - आ. डॉक्टर देवरावजी होळी यांची मागणी

जनदूत टिम    05-May-2020
Total Views |
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव अजून पर्यंत न झाल्याने जिल्ह्यातील रस्ते,घर बांधकाम, शौचालय बांधकाम, व रेती संबंधित सर्व बांधकाम बंद पडले आहेत.

Devraj Holi_1   
 
जिल्ह्यात रेतीचा साठा मुबलक प्रमाणात असल्याने दरवर्षी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जिल्हा व राज्याबाहेर केली जाते मात्र रेती उपलब्ध असूनही जिल्ह्यातील नागरिकांना बांधकामासाठी रेती मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असंतोष शासनाप्रती निर्माण झाला आहे. तसेच रेती चोरी होत असल्याने दरवर्षी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत चालला आहे. आता बांधकामासाठी केवळ एक महिना शिल्लक असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील नागरिकांना रेती मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व गडचिरोली जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव प्रक्रिया पूर्ण करून सुरू करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धव ठाकरे व महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे केली आहे.