दुर्गम भागातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व शरद पांढरे शिक्षणातील बदलाचे प्रणेते

किरण निचिते    04-May-2020
Total Views |

Sharad Pandhre_1 &nb 
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात जन्मलेले आणि शिक्षक म्हणून नोकरी करताना आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करताना त्यांनी आपल्या गावात नव्हे तर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी विभागाच्या शाळांमध्ये एक बदलाची मुहूर्तमेढ रोवण्याचा पाया म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. असे हे दुर्मिळ व्यक्तिमत्व नेहमी हसतमुख राहणारे धीरगंभीर शरदजी पांढरे सर ते कवी, सूत्रसंचालन यांबरोबरच त्यांचे विविध पैलू शहापूर तालुक्यात माहीत आहेत. ते जगाला माहित व्हावेत म्हणून आम्ही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोटासा प्रयत्न करीत आहोत.
 
श्री. शरद लक्ष्मण पांढरे सर हे इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, व सूत्रसंचालक म्हणून सुपरिचित असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. राज्य अभ्यास मंडळ सदस्य तथा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निमिर्ती मंडळ सदस्य (बालभारती) म्हणून इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या इ.६वी ते १०वी च्या प्रथम व तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन गटात पांढरे सरांचा सहभाग आहे. तसेच राज्यस्तरीय, विभाग, जिल्हा, तालुकास्तरीय प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हजारो शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. एसएससी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन, हाऊस सिस्टम, लँग्वेज लर्निंग लॅब, उपचारात्मक अध्यापन, आश्रमशाळेत लोकसहभागातून पहिला डिजिटल क्लासरूम व स्मार्ट क्लासरूम शेणवे व पिवळी येथे उभारण्यासाठी त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे सीएसआरच्या माध्यमातून ई - लर्निंग साहित्य, विविध शैक्षणिक साहित्य मिळविणे व उपक्रम राबविणे, वसतिगृह, किशोरवयीन मार्गदर्शन, करिअर गाईडन्स व व्यक्तिमत्व विकास, स्कील डेव्हलपमेंटसाठीचे वर्कशॉपच्या आयोजनातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतीने काम केले आहे.
 
नवनिर्मितीला वाव
ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण, ई-लर्निंग व तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विविध शैक्षणिक दालनांची निर्मिती, शाळेला आय एस ओ मानांकन, स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्याध्यापकांना, सहकाऱ्यांना सहकार्य व प्रेरणा, पालकांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन. सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने शेणवे येथे सुंदर बाग व सजावट करून स्कुल इकोसिस्टीम निर्माण केली.
शालेय शिक्षणात आंतरराष्ट्रीय शिक्षणविचार रुजविणे याबाबीवर गेली अनेक वर्षे काम करत आहेत. विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून, त्यांच्या नवनिर्मितीला वाव देऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त बिंबवून एक उत्तम माणूस म्हणून घडविण्यासाठी ते व त्यांचे सहकारी नेहमीच प्रयत्नशील असतात.
 
Sharad Pandhre01_1 &
 
सोशल मीडिया चा वापरातून शिक्षण
विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून सादरीकरण देखील केले आहे. इंग्लिश टीचर्स फोरम ठाणेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
पांढरे सर सोशल मीडिया चा पुरेपूर वापर व्हावा म्हणून त्यांनी शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती, काव्यलेखन, यू ट्यूब चॅनेल इ. द्वारे आपले लेखन करतात.
 
लॉकडाऊन मध्येही सक्रिय
आजच्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व्हिडीओ तयार करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ग्रामीण भागात मदत करत आहेत. तसेच शक्य आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअँप ग्रुप करून त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन पोचवत आहेत.
पांढरे सर जाणीव प्रतिष्ठान शहापूर या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य व माजी अध्यक्ष असून त्यामाध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे कार्य गेली अनेक वर्षांपासून करीत आहेत.
2009 पासून जाणीव मार्फत दरवर्षी 100 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व मदत जाणीवच्या वतीने केली जाते. त्याचबरोबर दुर्गम आदिवासी वाडीवस्तीवर दिवाळी भाऊबीज व फराळ वाटप, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
 
Sharad Pandhre012_1 
 
वनविभागाच्या सहकार्याने शिक्षण
कायापालट अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेणवे या शाळेचा देखील गौरव करण्यात आला. या शैक्षणिक वर्षांपासून ते आश्रमशाळा पिवळी येथे कार्यरत आहेत. येथे उपलब्ध परिस्थितीत उत्कृष्ट शैक्षणिक चळवळ त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने उभी केली आहे. वनविभागासोबत वृक्षारोपण, वन्यजीव साप्ताह, निसर्गाचे व जैवविविधतेचे जतन यासाठीही कार्य करतात. समाजसेवी व्यक्तिमत्व भरत पांढरे सर हे त्यांचे आदर्श असून आपल्या गावाच्या व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.
 
गरिबीतून समाजसेवेची आवड
शहापूर तालुक्यातील दहिगांव येथे एका समाजसेवी कुटुंबात जन्मलेल्या शरद पांढरे यांना पुढे एस बी कॉलेज मध्ये एनएसएस स्टुडंट असतांना समाजसेवेची आवड निर्माण झाली, 'बेस्ट स्टुडंट ऑफ द कॉलेज' हा सन्मान मिळून इंग्रजी विषय घेऊन प्रथम आले होते.
 
पुरस्कारांचे मानकरी
शरद पांढरे सरांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत 'राज्य उत्कृष्ट शिक्षक (नेत्रदीपक) पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर कुणबी महोत्सवात त्यांना 'कुणबी भूषण पुरस्कार', 'संस्कार पुरस्कार', दैनिक तरुण भारत व ठाणे वैभव याच्या वतीने 'आदर्श शिक्षक' सन्मान, प्रकल्प कार्यालयाचा 'गुणवंत शिक्षक सन्मान', इ.नी त्यांना सन्मानीत केले आहे. पांढरे सरांना मिळालेल्या पुरस्काराने शहापुरच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा खोवला गेला आहे.