तिघाडी सरकारची बिघाडी पत्रकार परिषद -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

जनदूत टिम    28-May-2020
Total Views |
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे वस्तुस्थितीपर मुद्दे मांडले ते खोडून काढण्यासाठी राज्यातील तीन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पण ही पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरला आणि महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बिघाडी झाली अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच तिघाडीच्या पत्रकार परिषदेतील सर्वच मुद्दे प्रविण दरेकर यांनी उदाहरण व वस्तुस्थितीपर दाखले देऊन खोडून काढले आणि काही मुद्दयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
Prvin Darekar_1 &nbs
 
कॉग्रसेचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर प्रत्युत्तर देताना प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सत्ता टिकविणे हे तुमच्यासाठी संकट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत आहे, ... मग पृथ्वीराज चव्हाण यांना हे सरकार आपले का वाटत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. राहुल गांधी निर्णय घेणारे आम्ही नाहीत असे का म्हणत आहेत. तुम्ही जर एकत्रित आहात, तर विजय वडेट्टीवार यांनी १० हजार एसटी मोफत सोडण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले.
 
उदयोग विषयक केंद्राच्या योजनांचा फायदा घेऊन धोरणे आखायाला हवीत आणि महाराष्ट्राचे स्थान अबाधित ठेवायला हवे पण उद्योगधंदे सुरळित करण्याचे नियोजन या सरकारमध्ये नाही. ५० हजार उद्योग सुरु करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात उद्योग सुरु झाले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
महाराष्ट्राने स्थलांतरित मजूरांचे नियोजन केले होते मग मग मजूर चालत का जात होते, रेल्वेने ८५ टक्के खर्च करुनही केंद्रावर टिका करत आहेत. व राज्याने १५ टक्के खर्च करुन शेखी मिरविणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी केला.
रुग्णांना खाटा का मिळत नाहीत,व्होटिंलेटर्स कुठे आहेत हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ काळजी करण्यापेक्षा उपायायोजना करण्याची आवश्यकता आहे. ती दिसत नाही असे सांगतानाच ते म्हणाले की, सरकारने चांगले काम करावे मग नक्कीच नाव होईल. पण इतके मृत्यू होऊन सरकारची बदनामी नाही तर काय होणार. आमच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल पण रुग्णांकडे लक्ष द्या, त्यांना सोयी सुविधा द्या तरच कारोनोला मुक्ती मिळेल अशीही सूचना त्यांनी केली. सरकार अस्थिर करण्याचे तुमच्याच मनाचे खेळ आहेत, अश्या परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करित नाही, याबाबत देवेंद्रजी फडणवीस यांनीही काल स्पष्ट केले आहे. पण कवेळ तुमचे अपयश झाकण्यासाठी अस्थिर-अस्थिर अशी बोंब मारली जात आहेत अशी टिकाही त्यांनी केले.
 
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना दरेकर यांनी सांगितले की, सरकारचे निर्णय हवेत होत नाहीत. निर्णयाचे जीआर व परिपत्रक असतात, त्यामुळे ते आधी दाखवा अन्यथा ती देण्याची आमची तयारी आहे. स्थलांतरित मजूंराच्या निधी बाबतही चक्क खोटे बोलत आहेत. रेल्वेचा ८५ टक्के खर्च केंद्राने केले त्याचे काय. ते कबुल करण्याचा मोठेपणा तुम्ही कधी दाखविणार. महाराष्ट्राला किती ट्रेन दिल्या आहेत त्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त श्रमिक ट्रेन दिल्या आहेत, पण तुमच्या निष्क्रियतेमुळे तुम्ही त्या वापरु शकल्या नाहीत. तुमच्या तयारी ची अपूर्णता आहे, तुम्ही मोकळ्या ट्रेन साडेल्या. त्याचा दोष तुम्ही रेल्वे मंत्रालयाला का देत आहात असा सवालही त्यांनी केला.
 
कोरोनाच्या सकंटकाळी वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे, नियोजन जमत नाही म्हणून बदनाम होत आहात. महाराष्ट्राच्या हिस्स्याचा निधी आणला आहे, आम्ही अजूनही निधी आणू समन्वायाची भूमिका ठेवा केवळ केंद्रावर टीका करत बसू नका असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, कायद्यानुसार महाराष्ट्राला सर्व निधी देण्यात आला आहे.उलटपक्षी अधिक निधी व आगाऊ रक्कम महाराष्ट्राला दिला आहे. पण केंद्राला दुषणे द्यायचे बंद करा. असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
केंद्राने दिलेल्या मदतीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला..राज्य सरकारने काहिच केले नाही. केंद्राने कोरोनासाठी किती साहित्य दिले, पीपीई किट्स, मास्क,याचा लेखा जोखा देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे असे सांगताना ते म्हणाले की, सरकारकडे मोठे अर्थतज्ञ आहेत मग १० हजार एसटी मोफत देणार होतात, त्याचे गणित अर्थतज्ज्ञांना जमले नाही का. ढिसाळ नियोजनाचा फटका चाकरमान्यांना बसला त्याची तुम्ही जबाबदारी घेणार का. आम्ही सरकारला सल्ला देण्याची गरज नाही, रुग्णांच्या उपाययोजनांएवजी सध्या सल्ला देण्याचे काम सरकारचे सुरु आहे. रोज सरकारचे सल्ले एकावे लागतात, पण उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, तुम्हीच सल्लागार आहात याची महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. कारण रोज काय उपायायोजना केल्याएवजी सरकार रोज सल्ल्याच्या भूमिकेतच सरकार संवाद साधत आहे.अशी टीकाही त्यांनी केली.
 
मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी चाचण्या झाल्या आहेत. आणखी चाचण्यांची आवश्यकता होती. त्यासाठी पुरेश्या यंत्रणा उपलब्ध करण्याएवजी आता खासगी लॅब मार्फत करण्यात आलेल्या कोरोनोच्या चाचण्यांबर बंदी आणून आता तुम्ही किती जीवांचे मृत्यू घेणार आहात असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
 
केंद्र सरकारने जी मदत केली ती नक्कीच मेहबानी नाही त्यांचेही कर्तव्य आहे आणि तुम्ही जे आज करित आहात ती पण जनतेवर मेहरबानी नाही तर तुमचे कर्तव्यच आहे. आधी जनतेचे जीव वाचवा मग वक्तव्य करा.आता जनता एकण्याच्या मनस्थितीत नाही. मुंबईत जर रुग्णालये उभी राहिली आहेत मग ती चालविण्यासाठी आज तुमच्याकडे डॉकटर्स, परिचारिका व वैदयकीय कर्मचारी आदी मनुष्यबळ कुठे आहे असा सवाल करतानाच दरेकर म्हणाली की, रुग्णालये निर्माण होत असतील तर मग आज अनेक रुग्ण ८ ते १० तास उपचारासाठी ताटकळत का राहिले आहेत. त्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले.त्याचे उत्तर कोण देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
राष्ट्रवादी कॉंग्रसचे मंत्री जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या ३५ टक्के रुग्ण आणि ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले तर हेच तुमचे उत्तम काम का.यामध्ये तुम्ही धन्यता मानत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काय अशी टिकाही त्यांनी केली.