सोशल मीडियावर महिला वर्गात सुरू असलेली चॅलेंजची निर्मिती कशी होते?

26 May 2020 12:51:17
मागील दोन महिन्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला वर्गात चॅलेंज करणे व ते पूर्ण करून फोटो व व्हिडिओ मोबाईलच्या स्टेट्सवर ठेवण्याचा मोठा ट्रेंड पहावयास मिळतो आहे. या स्त्री सुलभ ट्रेंडमुळे ती कोरोणाच्या चिंतेतून, विविध ताण तणावातून विरंगुळा शोधण्याचा व संकटातही सकारात्मकता बाळगण्याचा प्रयत्न करते आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लॉकडाऊनमुळे सातत्याने घरातल्या घरात राहिल्याने आलेला कंटाळा या निमीत्ताने दूर होण्यास मदत होते.
 
Nathicha Nakhra_1 &n
 
महिलांनी या ट्रेंडमध्ये आपल्या विविध छंद व हौशी जपल्या, पाककलेत विविध प्रयोग केले, कुटुंब नातेवाईक मैत्रीणी यांच्याशी या ट्रेंडच्या माध्यमातून संपर्क वाढवला. या चॅलेंज ट्रेंड मध्ये महिलांनी जी चॅलेंज वापरली त्यातही खुप विविधता, कल्पकता व नावीन्यपूर्णता पहावयास मिळाली. पारंपरिक वेशभूषा व केशभूषा जपण्यासाठी त्यांनी ट्रेडिशनल नथीचा नखरा ,चूडियां खनके ,कलरफुल्ल साडी ,मोकळे केस, अंबाडा ,गजरा ,विविध अलंकार आदी चॅलेंज राबविले तर गॉगल फोटो,बेस्ट फोटो,ब्लॅक अँड व्हाईट फोटो, स्टायलीशपणा ,झूकी नजर ,स्मोकी आईज चेअरमनफुल्ल क्लोजअप स्माईल असे चॅलेंजच्या माध्यमातून आपण मॉड व आधुनिक आहोत हेही प्रदर्शित केले. कौटुंबिक नाते संबंधावरही चॅलेंज आधारित होते मदर अँड डॉटर, कपल फोटो आदी. अंतरंगात झाकून पाहण्यासाठी तीने माझ्यातील चांगला गुण सांगा असे चॅलेजही खेळले. सगळीकडे कोरोनामुळे भीतीचे वातावरण असतांना तीने आशावाद जीवंत ठेवण्यासाठी फिर मुस्कुरायेगा इंडिया हा सुद्धा चॅलेंज घेतला.
 
पाककला हा तर महिलांचा आवडीचा व जीव्हाळ्याचा विषय त्या बाबतीतही त्यांनी विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे चॅलेंज दिले व स्वीकारले. आपले कसब व कल्पकता पणाला लावली. ठेवणीतली आभूषणे व साड्या व कपडे बाहेर निघाली. कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना मस्त पैकी साथ व प्रोत्साहन दिले म्हणूनच हे शक्य होवू शकले हे मात्र निश्चीत. तीच्या या धावपळीत तीला तीच्या कुटुंबातील मुली अगदी नवरीला नटवावे तसे आपल्या आई, काकू, वहिनीला सजवू लागल्या. या सर्व चॅलेंज देणे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी व उत्तमोत्तम करण्यासाठी राज्यातील लाखो महिलांनी आपआपल्या घरात राहून विरंगुळा शोधला.
Powered By Sangraha 9.0