खातिवलीत ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

जनदूत टिम    26-May-2020
Total Views |

गावदेवी ते वेताळ मंदिर आणि परिसरात दोन वर्षांपासून पाणीपुरवठाच नाही,
ग्रामपंचायतीचा नियोजन शून्य कारभार.

दोन वर्षात सलग 14 वेळा ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून, अर्ज विनंत्या करून पाणी मिळावे म्हणून मागणी करणाऱ्या गावदेवी मंदिर ते वेताळ मंदिर परिसरातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. म्हणून त्यांचा आज गावातील ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा हंडे व कळश्याचा मोर्चा गेला होता.

Khativali_1  H
 
याभागात नियमित वीजबिल भरणाऱ्या रहिवाश्याना वीज पुरवठा सुरळीत नसतो, कमी दाबामुळे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना डोळ्याचे त्रास होऊ लागले आहेत . याबाबत अनेकवेळा मागणी करून हि या ग्रामपंचायत सदस्यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे.
वेताळ मंदिर भागातील कष्टकरी महिलाना वेळेवर घरात पाहिजे तेव्हढे पाणी मागण्यासाठी दोन अडीच वर्षात 14 वेळा आपली मागणी घेऊन पाणी मागायला जायला लागणे म्हणजे हि केविलवाणी बाब आहे. फक्त उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास देणे याचा तर यातून अंत पाहण्याचाच प्रकार आहे.
 
श्रीमंत ग्रामपंचायत असतांना नागरिक पाण्यासाठी मोर्चा काढतात म्हणजे ग्रामपंचायत प्रशासन यात कमी पडते आहे का याचे आत्मपरीक्षण होणे आणि त्या विभागातील महिलांना वेळेवर पाणी मिळणे आवशक आहे.