मुरबाड़ तालुक्यात घेतलेल्या कोरोना swab चे रिपोर्ट यायला ३/४ दिवस का?

नरेश देसले    25-May-2020
Total Views |
मुरबाड : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आलेख बघता मुरबाड तालुक्याला त्याच्या झळा नजीकच्या काळात बघायला मिळत आहेत. कोरोना पासुन मुक्त असलेल्या मुरबाड़ तालुक्यात मोठ्या शहरातून येणाऱ्या व्यक्तीमुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची चिन्ह दिसत आहेत.
 
Corona Virous01_1 &n
 
अशातच मुरबाड़ तालुक्यात घडलेल्या घटना पहाता कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले जे कोणी संबंधित व्यक्ती असतात त्याचे आरोग्य विभागातर्फे swab चाचणी साठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवले जातात परंतु त्याचे रिपोर्ट यायला ३/४ दिवस लागतात. जिल्ह्यात इतरत्र शहरातून जे नमूने घेतले जातात त्याचे रिपोर्ट २४ तासात येतात मग मुरबाड़ तालुक्याला रिपोर्ट येण्यास एवढा विलंब का ?
 
रिपोर्ट ला होणाऱ्या विलंबामुळे सदर रुग्णाच्या शरीरात कोरोना आपली पाय मूळ घट्ट करून बसणार नाही का ? आणी टेस्ट केल्यानंतर जर एखादा +ve असलाच तर त्याच्यावर उपचार सुरु व्हायला किमान ४/५ दिवस लागतील...
तसेच रिपोर्ट येत नाही तोपर्यन्त सदर व्यक्तीला कोरंटाइन केलेले असते तो जोडीच्या इतर लोकांसोबत ३/४ दिवसात संपर्क येऊ शकतो त्याने बाधित व्यक्तीच्या संखेत भर पडू शकते..
 
सध्या तालुक्यातील स्थीती नियंत्रणात असताना ह्या गोष्टीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तरी प्रशासना कडुन योग्य ती कार्यवाही व्हावी व रिपोर्ट साठी होणारा विलंब टाळून ह्यासाठी योग्यती पावलं प्रशासना कडून उचलली जावी ही अपेक्षा व्यक्त करतो.