सर्वसामान्य खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांवर आली आहे आत्महत्येची वेळ

जनदूत टिम    25-May-2020
Total Views |
मुंबई : कोवीड १९ या आजाराची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या आणि सामाजिक बांधीलकी आणि आपल्या मुलाप्रमाणे असलेले विद्यार्थी ह्यांच्या आरोग्याच्या काळजी पोटी त्याच वेळेस कोचिंग क्लासेस मार्च चा पहिल्या आठवड्यात बंद केले आहेत. तेव्हा पासून क्लासेस संचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. क्लासेस मागील वर्षीच्या अंतिम टप्प्यात बंद झाल्यामुळे गेल्या वर्षात येणारी फी मिळालेली नाही शिवाय चालू वर्षात क्लासेस कधी सुरू होतील ह्याची शाश्वती नाही.
 
Coaching Classes_1 &
 
शासनाने २०११ पासून शिक्षक भरती केलेली नाही. आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी बी.एड. च्या पदव्या घेऊन बाहेर पडतात त्यामुळे तसेच असंख्य विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकऱ्या मिळत नसल्यामुळे कोचिंग सारख्या लघु उद्योगाकडे वळले होते. आणि आपली उपजीविका करत होते. असंख्य महिला घरगुती ट्युशन घेऊन आपल्या संसाराला हात थार लावत होत्या.
महाराष्ट्रात अशाप्रकारे जवळजवळ ५० हजार सामान्य कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये ५ लाख शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु या बंद मुळे सर्वांवर उपासमारी ची वेळ आली आहे.
 
ज्या तरुणांनी क्लासेस साठी भाड्याने गळे घेतले आहेत त्याचे भाडे थकले आहे. काही संचालकांचे घर आणि क्लासेस चा गाळा दोन्ही भाड्याचे आहे. त्याचे भाडे कसे भागवायचे तसेच घरी राशन कसे भरायचे यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही क्लासेस संचालकांनी आपले क्लासेस बंद केले आहेत.परंतु यामध्ये असलेले बेंच आणि इतर सामान कुठे ठेवायचे ही समस्या निर्माण झाली आहे.
 
काही संचालकांनी हा उद्योग निर्माण करण्यासाठी कर्ज घेतली आहेत त्याचे हफ्ते थकले आहेत. एकंदरीत विचार करता गेल्या वर्षीचे आर्थिक नुकसान त्याचप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षात क्लासेस कसे घ्यायचे. क्लासेस चालू करण्यास परवानगी मिळेल किंवा नाही या सर्व विवंचनेने क्लासेस संचालक आत्महत्येस प्रवृत्त होतील अशी भीती निर्माण झाली आहे.
 
तसे पाहता शासनाच्या दृष्टीने कोचिंग क्लासेस हा दुर्लक्षित भाग आहे. त्यांच्या कडे गांभीर्याने शासनाने कधी पाहिलेले नाही. क्लासेस संचालक हे शाळां बरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे काम करतात त्याच प्रमाणे देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य करतात या सर्वांचा शासनाने विचार करावा त्यांना आर्थिक सहकार्य करावे. इतर व्यावसायकांन प्रमाणे क्लासेस संचालकांना सशर्त क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी. अशी प्रकाश पाटील, उपाध्यक्ष कोचिंग क्लासेस संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळकळीची विनंती करत आहे.