अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भातील आ. विनोद निकोले यांच्या मागणीला यश

जनदूत टिम    25-May-2020
Total Views |
डहाणू : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भात माकप आमदार विनोद निकोले यांनी ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष मागणी केली असता त्या मागणीला यश आले आहे.
 
Vinod Nikole_1  
 
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, दि. 07 एप्रिल 2020 रोजी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्या निवेदनाला माझे जोड निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठवून मागणी केली होती की, सार्वजनिक / सरकारी व्यवस्था - साथीच्या या भयंकर आपत्तीमध्ये सरकारी आरोग्य यंत्रणा मजबूत असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सरकारी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांचे महत्त्व सर्वांना पटले आहे.
 
महाराष्ट्राचे सरकार नक्कीच यादृष्टीने विचार करेल अशी आशा आहे, असे पत्रात म्हटले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन मंत्रालय महिला व बालविकास विभाग यांच्या कडून दि. 20 मे 2020 रोजी शासन निर्णय क्रमांकः एबावि-2020/प्र.क्र.138(भाग1)/का.6 नुसार अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
 
त्यानुसार सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे फेब्रुवारी, 2020 मधील राज्य हिश्याचे प्रलंबित मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात अर्थसंकल्पिय अंदाज 2020-21 मध्ये 37000000/-, यापूर्वी वितरित केलेला निधी 6288000/-, प्रस्तावित वितरण 5921000/- असा निधी निर्गमित करण्यात आला आहे. असे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले आहे.
यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखाना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशीद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.