डीएसपी गृपच्या वतीने गरजुंना किराणा सामानाचे वाटप

जनदूत टिम    24-May-2020
Total Views |
वासिंद : लॉकडाउन मध्ये चौथ्यांदा वाढ झाल्याने गरीब गरजु दुर्बल घटकातील कुटुंबांची परिस्थिती हलाकीची झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती आजही बेताचीच आहे.त्यात शासनाकडुन कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे शेतमजुर, नाका कामगार, कंत्राटी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबात किराणा सामानाची चिंता वाढु लागली आहे.
 
DSP Group_1  H
 
याचा विचार करत वासिंदमधील दानशूर व्यक्ती समाजसेवक दिलीप शेठ पाटील यांच्या पुढाकाराने डीएसपी गृपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत वासिंद मधिल पुर्व -पश्चिम भागातील गरजु कुटुंबांना किराणा मालाच्या पॅकेटचे वाटप केले. या पॅकेट मध्ये साखर, कांदे, बटाटे, गोडेतेल १किलो, तूरडाळ अर्धा किलो, कपड्याचा साबण, अंगाचा साबण, भांड्याचा साबण २ नग, मसाला पाव किलो,हळद, जिरे, मोहरी ५० ग्रॅम, चहा पावडर,लहान मुलांना बिस्कीट, चॉकलेट असे प्रत्येकी सामान समाविष्ट करण्यात आले होते.
 
यावेळी गोरगरिबांच्या सुखादुःखात नेहमीच धावुन जाणारे डीएसपी गृपचे संस्थापक दिलीप शेठ पाटील,पंचायत समिती सदस्या संजीवनी कोचुरे, माजी पंचायत समिती उपसभापती गीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव काठोळे,माजी ग्रामपंचायत सदस्या दीपाली पाटील, राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष बळीराम शेलार,भाजप शहर अध्यक्ष अनिल शेलार, गजानन पाटील,संजीव जाधव सर, सागर पाटील, सुधीर पाटील, सौरभ पाटील, बाळा शेलार, नारायण लोणे, अमोल गोरले, प्रतिभा कांबळे ,सचिन जाधव, नरेंद्र कोचुरे, राहुल दिवेकर, सचिन दिवेकर,प्रतिक गायकवाड,दिपक कांबळे,सचिन रोकडे,बाळा हरड हे मान्यवर उपस्थित होते.