"माझे अंगण माझे रणांगण" या आंदोलनात आ प्रशांतमालक परिचारक यांनी घेतला सहभाग!

23 May 2020 01:55:12
सोलापूर : आंदोलन सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नांकडे राज्‍य सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आहे. रस्‍त्‍यावर उतरून, सोशल डिस्‍टसिंगचे उल्‍लंघन करून आम्‍ही आंदोलन करत नसून प्रतिकात्‍मक पध्‍दतीने हे आंदोलन आम्‍ही करित आहोत.
 
prashant paricharak color
 
या दोन तीन महिन्‍यात सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या अनेक मागण्‍या आम्‍ही केल्‍या. परंतु सरकारने मागण्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे.पोलीस,नर्सेस, सफाई कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या व इतर कोरोना योध्‍दयांना विमा संरक्षण कवच मिळावे, शेतक-यांना ,बारा बलुतेदार मदत मिळावी अशा विविध मागण्‍या आम्‍ही सरकारकडे केल्‍या मात्र सरकार याकडे डोळेझाक करित आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्‍याऐवजी वाढतच आहे. ही बाब दुर्देवी आहे. सरकारचे या मागण्‍यांकडे लक्ष वेधावे हाच या आंदोलनामागील हेतु आहे असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
आज वाड्याजवळ माझे आंगण माझे रणांगण या मोहीमेअंतर्गत महाराष्‍ट्र बचाओ आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सोशल डिस्‍टसिंग पाळत पंढरपूर नगरपरिषद भाजपा गटनेते उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पाणी पुरवठा सभापती गुरुदास अभ्यंकर, शहर भाजपाचे बादलसिंह ठाकूर, दशरथ काळे, दिलीप चव्हाण, कल्याण कोले या पदाधिका-यांसमवेत आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्‍य सरकारच्‍या निषेधाचे फलक दाखवत आंदोलन केले.
Powered By Sangraha 9.0