नितेश राणेंना कोण सांगणार? - कपिल पाटील

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
मुंबई : आमदार कपिल पाटील (अध्यक्ष, लोक भारती) 'कोरोना ने सगळ्या जगाला संकटात टाकलंय त्यात भारत अपवाद नाही. सर्वाधिक रुग्ण अर्थात महाराष्ट्रातच आहेत. याचं कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इतकं मोठं संकट आणि धोका असताना महाराष्ट्र सरकार अक्षरशः प्राणप्रणाने लढतं आहे.
 
nitkapil_1  H x
 
मात्र या परिस्थितीतही काहीजण ज्या वाईट पद्धतीने टीका करताहेत त्याबद्दल बोललं पाहिजे. शासनाच्या चुकांबद्दल टीका करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे. मात्र आता भाजपवासी झालेले आमदार नितेश राणे हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरत खालच्या पातळीवरची टीका करतात हे खेदजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अक्षरशः जीवावर उदार होऊन लढताहेत. त्यांच्या घराजवळचा चहावाला करोनाग्रस्त आहे.
 
या चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे अनेक सुरक्षा कर्मचारी चहा पीत असत. त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचं कुटुंब संकटात असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत मंत्रालयात जातात. सह्याद्रीवर जातात. मंत्रिमंडळाची बैठक घेतात. अधिका-यांच्या बैठका घेतात. लोकांशी बोलतात. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. हे न पाहता त्यांच्यावर इतक्या वाईट पद्धतीने टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही.
 
माझी नितेश राणे यांना विनंती आहे, राज्य सरकारला मदत करता येत नसेल तर किमान इतक्या खालच्या पातळीवरची टीका त्यांनी करू नये. चुका दाखवाव्यात, टीका नंतर जरूर करता येईल. पण आज कोरोनाशी एकत्रितपणे लढावं लागेल. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.