सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्याकडून तीन हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!!

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
शहापूर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन मुळे हातावरचे पोट असलेल्या गोर- गरीब गरजूंना उपासमार होऊ नये म्हणून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी खूप मोठा आधार दिला आहे.
 
 Suresh Mhatre_1 &nb
 
त्यांनी शहापूर तालुक्यातील तब्बल तीन हजार अशा गरजू कुटुंबांना १५ टन तांदूळ, ३ टन तूरडाळ, आणि तीन हजार लीटर तेल या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून दातृत्वाचे अनोखे दर्शन घडवले आहे. अशा बिकट परिस्थितीत मोलाचा आधार देऊन या संकटाशी लढण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला आहे. कोरोना संकटाचा सामना करत असतांना सामान्य जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, संचारबंदीमुळे सर्वकाही ठप्प असताना रोजगार बंद झाल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समाजकारणाचा वारसा असलेल्या शिवसेनेने शहापूर तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी, गरजू बांधवांना केलेली ही बहुमोल मदत त्यांना या संकटाचा धैर्याने मुकाबला करण्याची ऊर्जा देणारी आहे. एकजूटीने या कोरोना संकटाचा सामना करूया , एकमेकांना सहकार्य करू या !! हा लढा धैर्याने लढू या !!