करोनाच्या चाचण्या मोफत करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
नवी दिल्लीः सरकारी असो की खासगी प्रयोगशाळा करोनाची चाचणी मोफत करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आज दिले. वकील शशांक देव सुधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले आहेत.
 
supreme court_1 &nbs
 
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा मग त्या सरकारी असो की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने तात्काळ यासंबंधी आदेश जारी करावेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅब्रोटरीज (NABL) परवानी असलेल्या प्रयोगशाळा किंवा WHO आणि ICMR ने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळांमध्ये करोनाची चाचणी मोफत करावी, असं सुप्रीन कोर्टाने म्हटलंय.