कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ११३५ - आरोग्यमंत्री राजेश टोपे

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
Rajesh Tope_1  
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर ,हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.
 
दरम्यान, आज राज्यात ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर १ कल्याण डोंबीवलीमधील आहे.
 
१) काल सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.
 
२) काल संध्याकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला मधुमेह होता.
 
३) काल दुपारी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
 
४) दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात कोविड १९ बाधित रुग्णाची सहवासित असणा-या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला अस्थमा आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.
 
५) आज सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५९ वर्षीय महिलेचा कोविड१९ मुळे मृत्यू झाला.
 
६) आज पहाटे पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह होता. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
 
७) पुण्याच्या ५५ वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात काल कोविड१९ मृत्यू झाला.
 
८) कल्याण डोंबिवली येथील ५५ वर्षीय स्त्रीचा बाबू जगजीवनराम रुग्णालय, मुंबई येथे ६ एप्रिल रोजी.