चोरट्याच्या प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेल्या ट्रक ड्रायव्हरला लवकरात लवकर मदत मिळावी -- आ.सुजितसिंह ठाकुर

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
उस्मानाबाद:  चोरट्याच्या प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेल्या ट्रक ड्रायव्हरला लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रतोद, आ.सुजितसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
sujitsingh2_1  
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील ट्रक चालक काशीनाथ धोंडीराम कदम हे लातुर येथुन मालाचा ट्रक घेवुन पुण्याकडे कोरोना लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या पाससह जात असताना चोरट्यांनी कुरकुंभ औध्योगिक वसाहती जवळ दि.29 मार्च रोजी रात्री चोरट्यांनी चाकुने छातीत वार केल्याने त्यांचा मुत्यु झालेला आहे. मयत काशीनाथ कदम यांच्या घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सेवा देत असताना त्यांचा चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाला आहे. तरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.