मंत्रालयात कामकाज असे चालू आहे

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
मुंबई : आपल्याकडे सरकारी १६ व खाजगी १० अशा २६ लॅब सुरु झाल्या. जेथे ३०० ते ४०० तपासण्या होऊ शकत होत्या तेथे आज ५५०० तपासण्या होण्यापर्यंतची झेप आपल्या अधिकाऱ्यांनी घेतली.

mantralaya_1  H
 
जिल्हा, विभागीय कार्यालय, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि मंत्रालय या सगळ्या स्तरावर कोण काय करत आहे, कशा पध्दतीने आणि किती पातळ्यांवर सरकार काम करत आहे याचा हा धावता आढावा. याचा अर्थ एवढेच लोक काम करत आहेत असेही नाही. यापलिकडे हजारो अधिकारी, कर्मचारी, पोलिस, पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, मंत्री, अनेक लोक दिवसरात्र यासाठी लढत आहेत. मात्र या सगळ्यांना दिशा देण्याचे काम मंत्रालय, मुंबई महापालिका आणि विविध शहरातील छोट्या छोट्या कंट्रोल रुम करत आहेत.
- अनेक पातळ्यांवर कामे करताना त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लिड घ्यायचे ठरले. सगळ्या विभागांमध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार त्या विभागाला हवे होते. त्यासाठी ‘साथरोग अधिनियम १८९७’ या १२३ वर्षे जुना कायदा अंमलात आणला गेला. त्याचे नियम तयार झाले.
- आपल्याकडे मुंबई, पुणे आणि नागपूर असे तीन आंतराष्ट्रीयय विमानतळे आहेत. सगळ्यात आधी केंद्र सरकारने राज्य सरकारला १ फेब्रुवारी पासून ते १५ मार्च पर्यंतची परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची यादी दिली. त्यानंतरची यादी रोज येत गेली. ही यादी तब्बल २,५०,००० लोकांची होती. पण सरकारने १ मार्च पासूनची यादी विचारात घेतली कारण त्या आधीच्या लोकांना एक महिना होऊन गेला होता.
- यादी मिळताच सगळ्या जिल्हाधिकाºयांना जिल्हावार नावे कळवण्यात आली आणि ट्रॅव्हल हिस्ट्री, त्यांच्या सहवासात आलेले लोक यांची विचारपूस आणि तपासणीचे काम सुरु झाले.
- या कामात राज्यभरात महसूल, पोलिस आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे जवळपास २५ ते ३० लोक काम करत होते.
- या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यभरातील हेल्थ वर्करसाठी पुस्तिका तयार केली. मास्क, पीपीई कीट, एन ९५ मास्क, एचआयव्ही कीट या गोष्टी कोणी, कुठे, कशा वापरायच्या, येणा-या रुग्णांमध्ये काय तपासायचे याच्या सूचना त्यात होत्या.
- एखाद्या जिल्ह्यात रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली की त्या ठिकाणचे डॉक्टर त्याचा स्वॅब घेतात आणि तो तपासणीसाठी त्यांना ठरवून दिलेल्या लॅबमध्ये पाठवतात. त्यांचा रिपोर्ट आला की तो पुण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्टॅटेस्टिक ब्युरो यांच्याकडे पाठवला जातो. येथून त्याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय विभाग, आणि दिल्लीत आयसीएमआर यांना थेट कळवली जाते.
- आयसीएमआर दिल्ली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. अर्चना पाटील पुण्यातून रिपोर्ट करतात. तर मुंबई महापालिकेच्या वतीने डॉ. दक्षा शहा आणि लॅब व अन्य विषयाची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने देत असतात.
- माध्यमांना बोलण्याचे अधिकार वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने व सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक यांना देण्यात आले.
- मा.मुख्य सचिव
(अजोय मेहता )
कंट्रोल रुम आणि अन्य अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर रोज सकाळी ११ वाजता चर्चा करतात.
 
मा.मुख्यमंत्री(उद्धव ठाकरे साहेब )
एक दिवसाआड मुंबई महापालिका, मंत्रालय कंट्रोल रुम तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस प्रमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींग करत आहेत.
 
- औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदी
सगळे अधिकार हाफकिन महामंडळाला देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांना लागणाऱ्या गोष्टी तेथून घ्याव्यात असे आदेश काढण्यात आले आहेत. त्याची जबाबदारी हाफकिनचे एमडी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नियंत्रण कक्ष : मंत्रालयात सहाव्या मजल्यावर कोरोना नियंत्रण कक्षा मध्ये भूषण गगराणी, राजीव जलोटा, प्राजक्ता लवंगारे
हे तीन आयएएस तर मनोज पाटील या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
प्रवीण परदेशी (महानगरपालिका आयुक्त मुंबई)
- संपूर्ण मुंबईतील परिस्थितीचे नियंत्रण करणे
मनोज सौनिक (अप्पर मुख्य सचिव, वित्त)
- राज्यातील अर्थव्यवस्था पूर्व पदावर आणण्याचे उपाय योजणे, प्रभावित उद्योग व्यवसायिकांसोबत चर्चा करुन उपाय योजणे, विपरित परिणाम झालेल्या समाजातील विविध घटकांना सध्या सुरु असलेल्या योजनांच्या माध्यमातून नियमित व वेळेत अर्थसहाय्य देण्यासाठी निधी वितरीत करणे.
नितीन करीर - (अप्पर मुख्य सचिव, मसहूल)
- शासकीय उपाययोजनांची माहिती विविध विभागांच्या मंत्र्यांना देणे, मंत्री व लोकप्रतिनिधींकडून वेळावेळी येणाऱ्या सूचनांचे संकलन करुन संबंधीत विभागांना कळवणे.
राजीव जलोटा - (अप्पर मुख्य सचिव)
- विविध विभागांनी काढलेल्या धोरणात्मक निर्णयासंदर्भात उपाययोजना करणे, विविध विभागांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय क्षेत्रीय यंत्रणांना विविध माध्यमांतून कळवणे, मुंबई वगळता अन्य ठिकाणी निर्णयांच्या अंमलबजावणीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा घेणे.
विकास खारगे (प्रधानसचिव मुख्यमंत्री कार्यालय)
- मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेणे प्रत्येक विभागाशी मुख्यमंत्र्यांसाठी समन्वय साधणे.
डॉ. प्रदीप व्यास (प्रधान सचिव, आरोग्य विभाग)
- सार्वजनिक आरोग्य विषयक सर्व बाबींचे संनियंत्रण व उपाययोजना करणे.
डॉ. भूषण गगराणी - (प्रधान सचिव)
- राज्यातील सर्व उद्योग व्यवसायाबद्दलच्या अडचणी, विविध आयटी व आयआयटी सह सर्व खाजगी स्वरुपाच्या समस्या जाणून घेणे, प्रसारमाध्यमांना वेळावेळी माहिती देणे.
अश्निनी भिडे (प्रधान सचिव)
- मुंबई महानगर पालिकेच्या नियंत्रण कक्षाची संपूर्ण जबाबदारी.
डॉ. महेश पाठक ( प्रधान सचिव, नगरविकास)
- अन्न व नागरी पुरवठा विभागात काम केलेले असल्यामुळे या विभागामार्फत धान्य पुरवठ्याचे नियोजन, शिवभोजनचे नियोजन करणे.
आय.एस. चहेल (प्रधान सचिव, नगरविकास)
- क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कोरोनाचा प्रार्दूभाव झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे व चाचणी संबंधी माहितीचे संकलन करुन मार्गदर्शन करणे.

अनुप कुमार (प्रधान सचिव, पद्म आणि पणन)
- भाजीपाला व फळबाजार यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण आणि पुरवठा.

आभा शुक्ला प्रधान सचिव, सहकार)
- बंद पडलेल्या उद्योगांमुळे प्रभावित झालेल्या गरजूंना, मजूरांना निवारा व अन्न यांची व्यवस्था करणे.

मनिषा वर्मा (प्रधान सचिव, आदिवासी विकास)
- आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांनी केलेले प्रयत्न व देशातील अन्य राज्यांनी केलेल्या महत्वाच्या योजना यावर अध्ययन करुन उपाय सुचवणे.

संजीव जैस्वाल (प्रधान सचिव)
- रिटेल आणि होलसेल मार्केटचे नियोजन, नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याचे नियंत्रण करणे.

डॉ. संजय मुखर्जी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)
- सर्व वैद्यकीय महाविद्यालय क्षेत्रातील आरोग्यविषयक बाबी, उपचारासाठीची आवश्यक साधने, त्यांचे स्पेसिफिकेशन ठरवणे व खरेदीची उपाययोजना, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे व त्यांचा आप्तकालीन परिस्थितीत उपयोग करुन घेणे.
प्राजक्ता लवंगारे (सचिव, मराठी भाषा)
- विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य सचिवांसाठीचे संदेश घेणे, सीएसआर चे नियोजन करणे, स्वयंसेवी संस्था, नागरिकांकडून आलेल्या उपाययोजनांचे संकलन, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास प्रस्ताव देणे.
डॉ.अनुपकुमार (आयुक्त, एनआरएचएम़)
- कोरोना बाधित रुग्ण व त्यासंबंधी केलेल्या उपाययोजनांच्या माहितीचे व आकडेवारीचे संकलन करुन नियमीत स्वरुपात वरिष्ठांना देणे.

किशोरराजे निंबाळकर (सचिव, मदत व पूनर्वसन)
- मंत्रालयातील कोरोना नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापन, केंद्राकडून येणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी.
मा.मुख्य मंत्री , आरोग्य मंत्री ,अर्थ मंत्री , इतर सर्व मंत्री , अधिकारी , कर्मचारी , डॉक्टर्स , नर्स , पोलीस , सफाई कामगार , शिपाई, पत्रकार , आयटी तसेच लाईट , पाणी, भाजीपाला, दूध, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तु , एस टी , वेस्ट बस सेवा पुरवठा करणारे कर्मचारी , शेतकरी , व्यापारी , सर्व वाहनांचे ड्रायवर , चे इत्यादी
सर्वांना कोरोना विरुध्द च्या लढाई साठी देत असलेल्या त्यांच्या
सेवेबद्दल त्यांना विनम्र सलाम ! ! !