वासिंद ग्रामपंचायतीकडुन रस्त्यावर जंतुनाशक फवारणी

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
वासिंद : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जगात महामारी पसरली असुन त्याची झळ ग्रामीण भागात देखील जाणवु लागली आहे. शहरी भागाच्या मनाने ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण कमी प्रमाणात असले तरी खबरदारीची उपाययोजना म्हणुन वासिंद ग्रामपंचायतीमार्फत बाजारपेठेतील रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

Vasind Police Station_1&n 
वासिंद परिसरातील टाटा हौसिंग, शुभ वस्तु सारख्या मोठं मोठया गृहप्रकल्पमध्ये शहरी भागातील बहुतेक नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यांची नोंदणी ग्रामपंचायत, पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घेण्यात आली आहे. त्यात बहुतेक नागरिक अत्यावश्यक ड्युटी म्हणुन शहरी भागात दररोज जातात. तर दररोज वासिंद बाजारपेठेत आजुबाजूच्या तीस ते चाळीस गाव पाड्यांतील नागरिक खरेदीसाठी येत असतात. काही बेशिस्त नागरिकांमुळे लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला आहे. यामुळे खबरदारीची पावले उचलत वासिंद ग्रामपंचायतीच्या सरपंच लता शिंगवे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव काठोळे, विनोद म्हसकर, सतीश भोंडवे, काळुराम पवार, ग्राम विकास अधिकारी थोरात यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत जंतुनाशक फवारणी करून घेतली.