केंद्रसरकारच्या धर्तीवर मध्यम वर्गीयांना राज्य सरकारने मोफत नाही, तर किमान २ रू. किलो प्रमाणे गहू आणि ३ रू.किलो प्रमाणे रेशन दुकानातून धान्य देऊन दिलासा द्यावा - आ. सुजितसिंह ठाकूर

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे लागल्यानंतर लागलीच केंद्रातील मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा करून गरीब, शेतकरी, मजुर, महिला, वृद्ध, निराधार, विधवा, अपंग, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आदी समाजातील खूप मोठ्या वर्गाला मोठा दिलासा देण्याचे काम केले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरु झाली आहे.

sujitsingh_1  H 
 
कोरोना प्रादुर्भावया संकटाच्या काळात राज्य सरकारकडून केंद्राप्रमाणे मदत करून दिलासादायक निर्णयाची महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केशरी शिधापत्रिका धारकांना ८रुपये किलोप्रमाणे गहू व १२ रुपये किलोप्रमाणे तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. २०१५ साली मा. देवेंद्रजी फडणवीस सरकारने राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ६८ लाख शेतक-यांना २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३रुपये किलो प्रमाणे तांदूळ देण्याचा निर्णय करून देण्यास प्रारंभ केला. हे धान्य केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात मिळते. याप्रमाणे राज्य सरकारने मोफत नाहीतर किमान २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ घेण्याचा निर्णय करून या संकटाच्या काळात मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा. तसेच
१) केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत द्यावयाची एप्रिल,मे व जून या तीन महिन्यांचे नियमित दिले जाणारे धान्याशिवायचे धान्य अंत्योदय व प्राधान्य शिधा पत्रिका धारकांना वितरीत करावे.
२) कोरोना आपत्तीच्या काळात कोणाचीही अन्नाविना उपासमार होऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत.रेशन कार्ड असूनही तीन महिने रेशनवरील माल न घेतल्याने त्यांचे कार्ड ब्लॉक म्हणजे बंद झाले आहे अशांचे हे कार्ड चालू करून त्यांना धान्य द्यावे.
३) ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांना तहसीलदारांकडून नावे प्रमाणित करून रेशन दुकानातून धान्य द्यावे अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद मुख्य प्रतोद, महाराष्ट्र भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना केली आहे.