विठ्ठलाची महापूजा गुन्हा कसा?

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
पंढरपूर : विठुराया महाराष्ट्राचे आराध्य दैवत. विठ्ठल महाराष्ट्रातील लाखो भाविकांची माऊली. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत. ज्ञानोबा तुकोबांसह असंख्य संत महंतांचे दैवत. अखंड महाराष्ट्राचे दैवत. विठुरायाच्या मंदिराची व्यवस्था सरकार नियुक्त विश्वस्त मंडळाकडून होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुजितसिंह ठाकूर विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहतात.
 
Sujitsingh Thakur_1 
 
असंख्य वारकरी वर्षांनुवर्षे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन आहेत. आजवर अनेक संकटे आली परकीय आक्रमणे झाली पण वारकरी विठ्ठलाची सेवा करत आहेत. जात पात पंथभेद न करता विठ्ठलाची भक्ती महाराष्ट्रात पुराण काळापासून चालत आली आहे.
सध्या देशात कोरोनाचे संकट आले आहे. आषाढी आणि कार्तिकी निमित्ताने हजारो वारकरी पंढरीत विठू माऊली चरणी येत असतात. ऊन, वारा, पाऊस आजवर कुठल्याही संकटाने यात खंड पडला नाही. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी एकादशीला विठी माऊलची साग्रसंगीत विधिवत पूजा होत असते. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री आणि माघी आणि चैत्री एकादशीला विश्वस्त मंडळ समितीचे सदस्य विठ्ठलाची षोडशोपचारे मनोभावे पूजा करून राज्याच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात. दिनांक ७/१/२०२० रोजी कामदा एकादशी निमित्ताने होणारी नित्यपूजा विश्वस्त मंडळाचे सदस्य आ.सुजितसिंह ठाकूर आणि सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे ठरले होते.
 
हळूहळू मार्च मध्ये देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गहिरे होत गेले म्हणून दिनांक १७/३/२०२० रोजी पासून विठ्ठल मंदिर पंढरपूर सर्वसामान्य वारकरी भक्तांसाठी बंद करण्यात आले. इतकेच नव्हे तर दिनांक ४/४/२०२० रोजी क चैत्री कामदा एकादशीची यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही काळजी होती अन्यथा एकादशीला पंढरपुरात सालाबादप्रमाणे अडीच तीन लाख वारकरी विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी जमले असते.
 
राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटांमुळे विठ्ठल मंदिर बंद करून यात्रा देखील रद्द करण्यात आली परंतु नित्यनेमाने पुजारी पूजाअर्चा करत होते आणि करत राहतील. पूर्वीच ठरल्याप्रमाणे दिनांक ४/४/२०२० रोजी कामदा एकादशी निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते श्री सुजितसिंह ठाकूर आणि श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते पुजाऱ्याकरवी विठ्ठलाची पूजा पार पडली.
कोरोनामुळे संचारबंदी आणि जमावबंदी असल्याने गर्दी न होता मान्यवरांच्या हस्ते यथाशक्ती पूजा पार पडली. पुजेसाठी श्री ठाकूर दांपत्य कुठल्याही गर्दी शिवाय मंदिरात दाखल झाले. त्यांच्या सोबत कार्यकर्ते समर्थकांचा कुठलाही लवाजमा उपस्थित नव्हता. आता सांगा यात कुठला नियम मोडला गेला? कुठला कायदा तोडला गेला? तरी सुद्धा पूर्वग्रहदूषित प्रतिशोध घेण्याच्या सूड भावनेतून महाविकास आघाडी सरकारने आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांची पायमल्ली न करता विठ्ठलाची पूजा करणे हे पाप आहे का?
 
राज्य सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. समस्त वारकरी आणि नागरिक यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. राज्य सरकारने सुडातून केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध.. सज्जनशक्ती कायम जागृत असते त्यांच्या न्यायनिवाड्यातून कारस्थानी राज्य सरकारला अद्दल घडेल.