विधिमंडळातील आमदारांचे स्वीय सहाय्यक करणार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत!

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळातील सर्व आमदार यांचे स्वीय सहाय्यक यांनी आपापल्या परीने राज्यात उद्भवलेल्या कोरोना या महामारीच्या निर्मूलनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत आर्थिक मदत देण्याचे ठरविले आहे.
 
Assistance _1  
 
मागील प्रत्येक संकटात महाराष्ट्रातील आमदारांचे स्वीय सहाय्यक वेळोवेळी मुख्यमंत्री सहायता निधीला आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लावत आले आहेत. त्याचप्रमाणे या वेळीसुद्धा स्वीय सहाय्यक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
प्रचंड मेहनतीने राज्यातील आमदार महोदयांबरोबर काम करणारे स्वीय सहाय्यक हे जसे आमदार महोदयांच्या मतदारसंघातील नागरिकांची कामे करण्यासाठी पुढे येत असतात. तितक्याच तत्परतेने ते राज्यात उद्भवलेल्या या संकटप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
 
यापूर्वीही विधिमंडळातील सर्व आमदारांच्या स्वीय सहाय्यक यांनी पूरग्रस्त निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी ला केली होती. तोच प्रयत्न त्यांनी यावेळच्या "कोविड -१९ याप्रसंगी करण्याचे ठरविले आहे.