राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महानंद, नागपूर, धुळे, वसई-विरारला नवे अधिकारी

जनदूत टिम    08-Apr-2020
Total Views |

mantralaya_1  H
 
मुंबई : • डॉ. एन. बी. गिते ( IAS ) : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव म्हणून कार्यरत होते. आता
महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
• संजय यादव ( IAS ) : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. आता
धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
 
• गंगाधरन डी. ( IAS ) : धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता वसई - विरार महापालिकेचे
आयुक्तपदी नियुक्ती
 
• योगेश कुंभेजकर ( IAS ) : चंद्रपूर (राजूरा) येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त