माधुरी दीक्षितनं आपली कार एमपीव्हीला मॉडिफाइ्ड बनवले

07 Apr 2020 00:04:33
माधुरी दीक्षितने आपली कार एमपीव्हीला देशातील प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाबडिया यांच्याकडून डिझाईन करून घेतले आहे. चार महिन्यापूर्वी म्हणजे देशात लॉकडाऊन सुरू होण्याआधी माधुरी दीक्षित यांनी आपली कार मॉडिफाई बनवण्यासाठी दिली होती. चार महिन्यांनंतर या कारचे मॉडिफाइड करण्यात आले. माधुरीची ही कार लग्झरी कार नव्हती तर ती टोयोटोची इनोव्हा क्रिस्टा होती. परंतु, मॉडिफाय केल्यानंतर ही कार आता मर्सिडीज बेन्ज सारखी दिसायला लागली आहे.
 
Madhuri_1  H x
 
माधुरी दीक्षित यांच्या या कारचे मॉडिफाई करण्यासाठी चार महिन्यांचा काळ लागला आहे. चार महिन्यात या कारचे मॉडिफाय करण्यात आले आहे. या कारमध्ये एक फ्रिज, ट्रे होल्डर आणि कप होल्डर लावण्यात आले आहे. तसेच फोटोत आपण दोन स्क्रीनही पाहू शकतात. एका बाजुला तिसरी स्क्रीनला सेंटर कन्सोल लावण्यात आले आहे. डिझाइनर छाबडिया यांनी या कारसाठी चार महिने घेतले आहे. या केबिनला ऑडी ए८एलएस प्रमाणे तयार करण्यात आले आहे.
 
ज्या टोयोटो क्रिस्टा कारला डिझाईन करण्यात आले आहे. त्या इनोव्हाचे टॉप ट्रिमचे पेट्रोल व्हर्जन मॉडेल आहे. या कारची किंमत किती आहे, याबाबत अद्याप काही माहिती सांगण्यात आली नाही. या गाडीचा लूक पूर्णपणे बदलेला आपल्याला दिसत असला तरी या गाडीच्या इंजिनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आली नाही. आता या कारचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशलवर व्हायरल झाले आहेत. लोकांनाही ही कार खूप आवडली आहे.
 
या कारला डीसीने एस क्लासच्या तुलनेत अधिक आरामदायक बनवण्यात आले आहे. यात इंटिरियर मध्ये सीटवर हलक्या बेज रंगाचे लेदर अपहोस्ट्री लावण्यात आली आहे. गाडीच्या केबिनमध्ये वूड आणि ब्रश अॅल्यूमिनियमचा प्रयोग नव्याने करण्यात आले आहे. गाडीच्या तिसऱ्या पंक्तीत फार काही जास्त बदल करण्यात आले नाहीत. तो स्पेस जाणीव पूर्वक ठेवण्यात आला आहे. डिझाईन करण्यात आलेली इनोव्हा क्रिस्टा ही ७ सीटरची कार आहे.
Powered By Sangraha 9.0