महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करकंब येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

07 Apr 2020 00:37:46
सोलापूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव असताना गोरगरीब लोकांना मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसर आहे. वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पत्रकार बांधवांना आणि आशा सेविकांना जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर, तेल, डाळ, साबण, मीठ,टिकट तसेच सॅनिटायझर, मास्क, इत्यादी वस्तूंचे पॅकेट वाटप करण्यात आले. वाटप तहसीलदार वैशाली वाघमारे, सरपंच आदिनाथ देशमुख, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नरहरी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

Dhanya Vatap_1  
 
यावेळी आशा स्वयंसेविकानी त्यांना घरोघरी जाऊन कोरोना व्हयरसच्या संदर्भात सर्व्हेक्षण करावे लागत आहे. परंतु शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाहीत. शिवाय दररोज पन्नास पेक्षा अधिक कुटुंबांचे सर्व्हेक्षण करून देखील मासिक केवळ अडीच ते तीन हजार रुपयेच मानधन मिळते. असे त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, महेंद्र पवार, संजय गायकवाड, लक्ष्मण वंजारी ,समाधान डूबल ,सर्व पत्रकार व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

DhanyDILIP  BAPU DHOTREa
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्व सोलापूर जिल्ह्यातील व माझ्या पंढरपूर तालुक्यातील सर्व गोरगरीब वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आशा वर्कर पत्रकार बांधव व पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही सर्वांना गहू तांदूळ, तेल व डाळी व जीवनाश्यक वस्तू सर्वांना वाटप केल्या आहेत या या अनुषंगाने आम्ही इथून पुढे सर्व सर्वांना पाहिजे असेल तेवढी आम्ही मदत करू
Powered By Sangraha 9.0