भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल

जनदूत टिम    06-Apr-2020
Total Views |
करोनाला आकर्षित करू नका
मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंर्तमन ९० टक्के पॉवरफुल असते.

lord-buddha_1   
 
बाह्यमनाने अंर्तमनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंर्तमन प्रयत्नांची पराकाष्ठा करते. व जगातील सर्व प्राण्यांची अंर्तमन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात.
जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला LAW OF ATTRACTION आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात.
 
भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल “ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारची तरंग वातावरणात आहेत. तुम्ही ज्या चॅनलचे बटन दाबता तोच ट्यूनअप होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होईल. म्हणून तुम्ही जो अँटेना लावताल त्याच प्रकारची तरंग तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करताल.
 
तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित कराल. WORD IS WORLD, THOUGHT IS WORLD.शब्द व विचार हे जग आहे. म्हणून सकारात्मक विचार करा.एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत “क्वांटम फिजिक्स ” चं सिद्धांतानुसार ती फलदायी होते.
काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही .