मॅच फिक्सिंग करणाऱ्याला फासावर लटकवा - जावेद मियादाद

जनदूत टिम    04-Apr-2020
Total Views |
इस्लामाबाद : जो खेळाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करेल त्याला शिक्षा म्हणून फासावर लटकवले जावे, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद यांनी व्यक्त केले आहे. मियादाद यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मॅच फिक्सिंग करणारे आपल्या कुटुंबाची फसवणूक करतात, असे म्हटले आहे.
 
miandad_1  H x
 
मॅच फिक्सिंग करणाऱ्या किंवा त्यात सहभागी असणाऱ्या क्रिकेटपटूला कठोर शिक्षा दिला पाहिजे. क्रिकेट बोर्डाने एक उदाहरण घालून दिले पाहिजे. असे कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. क्रिकेट लोकांशी जोडलेला खेळ आहे. जेव्हा एखादा खेळाडू सिक्स मारतो किंवा सामान जिंकतो तेव्हा चाहते पाकिस्तान- पाकिस्तानचा जयघोष करतात. लोक आनंद साजरा करतात. मॅच फिक्सिंग हा गुन्हा एखाद्याचा खुन केल्यासारखाच आहे आणि त्याची शिक्षा फाशीच आहे, असे ते म्हणाले.
 
जे खेळाडू मॅच फिक्सिंग करतात. ते आपल्या आई-वडीलांना देखील फसवतात. अशा लोकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही. खेळाडू फिक्सिंग करतात आणि पैसे कमवतात त्यानंतर ते पुन्हा संघात येतात. अशा क्रिकेटपटूंना बोर्डाने धडा शिकवला पाहिजे, असे मियादाद म्हणाले.