उज्वला गॅस योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व खातेदारांना ७४८ रुपये अनुदान बँकेत जमा होणार

जनदूत टिम    04-Apr-2020
Total Views |
सोलापूर : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांची सर्वत्र अडचण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्याना पुढील तीन महिने कॅलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Ujwala Gas_1  H
 
या सोलापुरातील चिडल्या उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. सोलापुरातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्टर करून मोफत सिलेंडर योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान भारत गॅसची सेल्स ऑफिसर राजू कुमार यांनी केला आहे. यापूर्वी ज्यांनी उज्वला गॅस योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना पुढील तीन महिने मोफत सिलेंडर उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याच्या बँक खात्यावर प्रतिमहिना ७४८ रुपये अनुदान जमा होणार आहे नजीकच्या गॅस एजन्सी कार्यालयात जाऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा नाव नोंदणी करावी लगेच किंवा लाभार्थ्यांना मोबाईल वरून करता येते.