जळगाव जिल्ह्यात आणखी चार नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या २२ वर; जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ७ वर

जनदूत टिम    28-Apr-2020
Total Views |
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२ झाली. आज आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील तीन तर जळगावमधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित चार रुग्णांमध्ये ३ पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे.
 
coronavirus_1  
 
आज आढळून आलेल्या बाधित चार रूग्णांपैकी दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रूग्ण भुसावळ येथील आहेत.
जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी ५२ रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित ४८ रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांपैकी एक जण डॉकटर असल्याचे कळते. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित २२ रूग्णांपैकी सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे.