सात गॅस सिलिंडरचा स्फोट

जनदूत टिम    25-Apr-2020
Total Views |

nashik01_1  H x
 
नाशिक: नाशिकच्या भीमवाडी झोपडपट्टीला आज सकाळी  एकामागोमाग सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने अचानक भीषण आग लागली. याचवेळी आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे. या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे.