पंढरपुरात शिव भोजन थाळीचा आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते शुभारंभ

जनदूत टिम    02-Apr-2020
Total Views |
सोलापूर : गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला असून याचा शुभारंभ आज आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आला.
 
Bharat Nana Bhalke_1 
 
शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना आहे. यावेळी शुभारंभाप्रसंगी प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मेडीकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या झालेल्या परिस्थितीमुळे शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत श्रीकृष्ण हॉटेल पश्चिमव्दार, चौफाळा व साई भोजनालय, भक्ती मार्ग या दोन ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. केवळ पाच रुपयात ही थाळी जूनपर्यंत मिळणार असून, कारोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब जनता, स्थलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, बेघर इत्यादी नागरीकांच्या हालआपेष्टा होऊ नये यासाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे.