भटक्या समाजातील लोकांना धनंजय महाडिक यांच्या कडून मदतीचा हात

जनदूत टिम    02-Apr-2020
Total Views |
कोल्हापूर: कोल्हापूर शहर व परिसरातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व देश व महाराष्ट्र लाॅकडाऊन असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भटक्या समाजातील गोरगरीब कुटूंबाचे प्रचंड प्रमाणामध्ये हाल होत आहेत त्या अनुषंगाने कोल्हापूर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक व भागीरथी महिला संस्थेचे सौ.अरुंधती ताई वहिनीसाहेब महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या संकल्पनेतून दिनांक 1 एप्रिल पासून लमाणी, नंदीवाले तसेच फिरून व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील सर्व लोकांना ५०० किटचे वाटप करण्यात आले आहे.
 
Bhatki_1  H x W
 
या सर्व किटचे वितरण शहर व ग्रामीण भागामध्ये भागीरथी महिला संस्थेच्या महिला भगिनी व धनंजय महाडीक युवाशक्तीचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करीत आहेत यामध्ये फक्त गोरगरीब लोकांनाच हे किट वाटप करीत आहोत. या माध्यमातूनच माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी एक समाजसेवेचे व्रत अंगिकांरले आहे. सर्व गोरगरीब व दिनदलीतांसाठी महाडिक कुटुंबिय सातत्याने आघाडीवर आहे.
 
रोजच्या दगदगीच्या जीवनात आपण सामाजिक कार्य करीत असतो तसेच मध्यमवर्गीय कुटुंब रोजनदारी करत पोट भरत असतात अशातच भटक्या समाजातील कुटूंबांना भटकंती करून पोट भरावे लागते. सध्या कोरोना व्हायरसचे संकट जगासह कोल्हापुरकरांवरती ही आले आहे. अशामध्ये भटकंती करणाऱ्या कुटुंबाना पोट भरायचे अक्षरशः अवघडच!
ही परिस्थिती जाणून घेत भागीरथी महिला संस्थेच्या व माजी खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दररोज भटकंती करणा-या लमाणी, नंदीवाले कुटुंबाना तांदूळ,चक्की फ्रेश आटा,चहा पावडर, मीठ,साखर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या ५०० किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती खा.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 
dhananjay Mahadik_1 
 
गोरगरीब जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा असून या संकटाच्या काळात गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे पवित्र असे महान काम आमच्या हातातून घडत आहे. आणि ईथून पुढेही अशीच सेवा आम्ही करीत राहू.
- धनंजय महाडीक ( भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र)