भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल

05 Mar 2020 20:51:37
सोलापूर : भाजपाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसून येणार आहे. आता कोर्टाने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्या विरोधात आता अक्कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर बुधवारी सोलापुरातील न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार तहसीलदारांनी ही फिर्याद दिली होती. त्यानुसार सोलापूर न्यायालयाने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला . त्यामुळे आता भाजपाचा एक खासदार महाराष्ट्रातून कमी होणार आहे.
 
Dr. Jayasiddheshwar_1&nbs
 
ससोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याआधी जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला होता. मागील आठवड्यात यावर अंतिम सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच आपल्याकडून जातीचे प्रमाणपत्र गहाळ झाल्याचा दावा करत आपली खासदारकी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
 
जयसिद्धेश्वर महाराज यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. परंतु खोटा जातीचा दाखल निवडणूक आयोगाकडे दाखल केल्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे.
 
Powered By Sangraha 9.0