कल्याण प्रांत कार्यालयातील लिपिकाची शेतकऱ्यांकडे ३५ हजारांची लाचेची मागणी; गुन्हा दाखल

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

कल्याण प्रांत कार्यालयातील लिपिकाची शेतकऱ्यांकडे
३५ हजारांची लाचेची मागणी; गुन्हा दाखल

जनदूत टिम
कल्याण: मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग आणि आता मुंबई वडोदरा एक्सप्रेस वो हे महामार्ग कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे 'भ्रष्ट' राजमार्ग बनले असून यावरुन प्रत्येक जण धावताना दिसून येत आहे. याचा एक भाग म्हणून या कार्यालयातील लिपिकाच्या विरोधात शेतकऱ्यांकडे ३५ हजार रुपयांची लाच मागितली म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक निलिमा कुलकर्णी या करीत आहेत.
 
corruption_1  H
 
याबाबत सविस्तर हकिकत अशी की वरपगाव ता कल्याण येथे राहणारे रवींद्र आप्पा निचिते याची मुरबाड तालुक्यातील एकलरे या गावी असलेल्या सन २/२५ मधील १०:० या जमिनीचे ते कुळमुख्तार धारक आहेत. ही जमीन त्यांना किसन मोती निचिते यांना विकायची आहे. परंतू प्रांत कार्यालयात सदर जमीन कुळकायदा कलम ४३ नुसार पात्र असल्याने ही अट शिथिल करण्यासाठी निचिते यांनी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अर्ज केला होता. त्याचा दावा क्रमांक व्हीपीएसआर ५८/१९ असा आहे.
 
अर्ज दाखल करुन अनेक महिने झाले असल्याने व निचिते हे खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने त्यांनी हे काम टिटवाळा जवळील नांदप गावातील शेतकरी जीवन मोतीराम शेलार यांच्या कडे दिले. त्यामुळे प्रांत कार्यालयातील हे काम करणारे लिपिक विनोद मुगूटराव यांची भेट घेऊन कामा विषयी विचारणा केली असता हे काम माझ्या कडे नाही पण मीच ते काम करणार आहे, असे सांगून यासाठी माझ्या सह इतरांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून माझ्याकडे ३५ हजार रुपयांची मागणी केली असा आरोप तक्रारीत करण्यात आला असन त्याची रेकॉर्डिंग असल्याने कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात लिपिक विनोद मुगूटराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.