लॉकडाउनला अमेरिकेत विरोध

जनदूत टिम    31-Mar-2020
Total Views |
या त्रिकोणीय राज्यांमधील महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी अल्पकालीन संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले व या प्रस्तावास या तिन्ही राज्यांच्या राज्यपालांनी कडाडून विरोध केला. क्युमो म्हणाले की, ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या आजवरच्या भूमिकेशी विसंगत आहे.
 
america_1  H x
 
या तीन राज्यांमध्ये संचारबंदी लागू केल्यास अराजकता व यादवी निर्माण होईल. ट्रम्प यांचा हा उपाय व्यवहार्य व वैध आहे, असे मला वाटत नाही.करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टिकट या राज्यांना काही काळासाठी उर्वरित देशापासून पूर्णपणे विलग करण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास येथे संघीय युद्धसदृश स्थिती निर्माण होईल व त्यातून अराजकता आणि यादवी माजेल, अशा शब्दांत न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू क्युमो यांनी विरोध दर्शवला. यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका मवाळ केली.
 
विरोधानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली. या राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अप्रिय ठरेल. मात्र, तो गरजेचा आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. या राज्यांतील गर्दीच्या ठिकाणी, तरी काही काळासाठी संचारबंदी लागू करावी लागेल. याशिवाय प्रवासावरही निर्बंध आणावे लागतील. याविषयी आम्ही लवकरच निर्णय घोषित करू, असे ट्रम्प म्हणाले. या तीन राज्यांतील नागरिकांनी पुढील १४ दिवस प्रवास टाळावा अशी सूचना द सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने केली आहे.
या तीन राज्यांत अल्पकाळासाठी संचारबंदी लागू केली, तर शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण नोंदवली जाईल, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेसदेखील मोठा फटका बसेल. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत न्यूयॉर्कची सीमा बंद करणार नाही. मालवाहू ट्रक, अन्नधान्य व अन्य वस्तू न्यूयॉर्कमध्ये पूर्वीप्रमाणे यायलाच पाहिजेत, अशी ताठर भूमिका त्यांनी व्यक्त केली.
करोनाच्या थैमानामुळे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसही फटका बसला आहे. अध्यक्षपदाचा पक्षांतर्गत उमेदवार ठरवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये होणारे प्रस्तावित मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. हे मतदान २८ एप्रिल २३ जून या कालावधीत घेण्यात येईल. मतदानासाठी हजारो लोक बाहेर पडतील हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.