अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांच्या मदतीसाठी उद्योजक अभिजीत पाटील सरसावले

31 Mar 2020 13:15:33
सोलापूर : पंढरपूरातील DVP उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत प्रशासन शासन स्तरावर काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिस,पत्रकार प्रशासनातील अधिकारी महसूलच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पंढरपूर मधील हॉटेल विठ्ठल कामत मधून सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत नाश्ता दुपारचे जेवण व रात्रीचे अमर्यादित जेवणाचे पार्सल तयार करून घेऊन जाण्याचे आवाहन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय अभिजीत पाटील यांनी केले आहे.या उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी मा.सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक मा.अरूण पवार,नगरपालिके मुख्याधिकारी मा.अनिकेत मानोरकर, प्रांताधिकारी मा.सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
 
Abhijit Patil_1 &nbs
 
 
कोरोणा या अतिभयंकर व्हायरस मुळे संपूर्ण भारताबरोबर महाराष्ट्राचा आकार उडालेला असून या कोरोनाव्हायरस सामना करण्यासाठी व कोरोनाव्हायरस मध्ये बाधित संशयित रुग्ण आढळतात त्यांना आपले माणुसकीची साद देऊन आपले वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणाऱ्या सर्व डॉक्टर लोकांसाठी सुद्धा विठ्ठल कामत मधून जेवणाची व्यवस्था ठेवले असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अभिजीत पाटील यांनी ही संकल्पना खरे आहे. यावेळी पोलीस उपनिरिक्षक डाॅ.सागर कवडे प्रांताधिकारी सचिन ढोले, डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील, अमर पाटील,नितीन सरडे, घोडके,अफसर शेख व सर्व पोलिस कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगाप्रमाणे आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आपल्या देश व महाराष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे,तसेच डॉक्टर,नर्सेस, पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी, पत्रकार मित्र आपले कर्तव्य बजावत आहेत, आपले कर्तव्य म्हणून DVP उद्योग समुहाकडुन फुल ना फुलाची पाकळी पंढरपूर मधील हॉटेल विठ्ठल कामत मधुन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत नाश्ता,दुपारचे जेवण व रात्रीचे जेवणाचे पार्सल कृपया इथून घेऊन जावे असे आवाहन डीव्ही उद्योग समूहाचे अभिजित पाटील यांनी केले आहे त्यांनी बोलताना सांगितले की फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तेच सर्वांनी कर्तव्यावर असणाऱ्यां सर्वांसाठीची जबाबदारी पार पाडावी अशी ही त्यांनी यावेळी सांगितले. 
Powered By Sangraha 9.0