मावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे

जनदूत टिम    03-Mar-2020
Total Views |

मावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे

 
tiger_1  H x W:
 
मावळ तालुक्यातील सांगवडे गावात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली आहेत. ही बाब आज सकाळी समोर आली असून त्यांना वनविभागाने तपासणी करीत ताब्यात घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांचा जन्म नुकताच दहा दिवसांपूर्वी झाला असावा असं वनविभागाकडून सांगण्यात आलं.