देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

03 Mar 2020 18:06:15

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन दि. 4 मार्च रोजी सायं. 5 वाजता विधानभवन, मुंबई येथे होत आहे.
 
artha Sankalpa02_1 &
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
Powered By Sangraha 9.0