विमानतळ फनेल झोन व अन्य बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करावी - आमदार पराग अळवणी

जनदूत टिम    03-Mar-2020
Total Views |

विमानतळ फनेल झोन व अन्य बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करावी - आमदार पराग अळवणी

जनदूत टिम 
मुंबई : मुंबई विमानतळाच्या फनेल झोन मुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद करावी ही मागणी आज आमदार पराग अळवणी यांनी विधानसभेत केली. विधानसभेत मुंबईच्या गृहनिर्माण समस्येबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी सदर मागणी केली. मुंबईतील फनेल झोन सोबत COD, CRZ, ६ मिटर रुंदीचे रस्ते इत्यादी ठिकाणच्या इमारतींना असलेल्या मर्यादांमुळे तेथील इमारतींचा पुनर्विकास रखडला असून इमारती जुन्या होत चालल्याने धोकादायक होऊ लागल्या आहेत. आशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी विशेष तरतुदींची मागणी त्यांनी केली.
 
parag alvani_1  
 
मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील मंदीचे एक प्रमुख कारण अव्वाच्या सव्वा वाढलेले शुल्क (प्रीमियम) असून यामुळे होत असलेली खर्चातील वाढ विकासक नेहेमीच ग्राहकांकडून घेण्याचा प्रयत्न करतो. या मुळे झालेली महागाई ग्राहकाला परवडत नसून घर खरेदी बंद होण्याचे हे सुद्धा एक कारण आहे असे सांगत शुल्क कमी करावे अशी मागणी केली. तसेच आपल्या खासगी विधयेकाद्वारे केलेल्या मागणीनुसार भाडेकरूंना स्वतः पुरती जागा बांधण्याचा अधिकार देण्यासाठी शासनाने कायदेशीर तरतूद केली असली तरी सदर शुल्क महाग पडत असल्यामुळे भाडेकरू बांधत असलेल्या इमारतींना शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा पराग अळवणी यांनी केली.