राज्यातील वृतपत्रांना,पत्रकारांना शासनाने तात्काळ पँकेज द्यावे - राज्याध्यक्ष डी एस डोणें यांची मुख्यमंत्री ठाकरेंचे कडे मागणी

28 Mar 2020 14:02:36
इचलकरंजी : महाराष्टाला कोरोना या महाभयंकर आजाराने विळखा घातलेने देशभर लाँक डाऊन केले असतानाही राज्यातील परिस्थीतीची माहिती घेवून चँनेल व वृतपत्रा मार्फत सर्व जनता व शासनापर्यंत पोहचवीणेचे आहोरात्र काम क़रून मदतीचा ओघ सर्वाना देणार्या लहान व मध्यम वृतपत्र व पत्रकारांना केंद्र व राज्य शासनाने वंचीतच ठेवले आहे,अशा वृतपत्र व पत्रकारांना
तात्काळ मदतीचे पँकेज प्रत्येकाच्या नावे बँकेत जमा करावे अशी अग्रहाची मागणी मुख्यमंत्री नाम,उद्धव ठाकरे यांचेकडे वृतपत्र मालक संपादक संघाचे राज्याध्यक्ष डी एस डोणे यांनी केली आहे।मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकाराच्या योगदाना बद्दल त्यांना धन्यवाद देवून मागणी रास्त असून लवकरच राज्यशासन या प्रश्नी निर्णय जाहिर करेल असे राज्याध्यक्ष डी एस डोणे यांना दूरध्वनीवरून सांगीतले।
Powered By Sangraha 9.0