कामगार, बँक व फायनान्सच्या हफ्ते माफ किंवा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावे

जनदूत टिम    27-Mar-2020
Total Views |
सोलापूर : सोलापूर शहरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार मोठयाप्रमाणात आहेत. सदर कामगारांचे उदरनिर्वाह रोजंदारीवर अवलंबून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागू केली असल्याने सोलापूर शहरात विडी उद्योग, यंत्रमाग उद्योग व बांधकाम व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत.
 
Praniti Shinde_1 &nb
 
त्यामुळे सदर कामगारांना रोजचा पगार मिळत नाही यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सदर कामगारांनी बँक व फायनान्स कंपनीकडून विविध कारणांकरीता लोन घेतलेले आहेत. सद्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे लोनचे हफ्ते भरण्याकरीता सर्व कामगारांना अडचणी येत आहेत.
 
यामुळे सदर कामगारांनी बँक व फायनान्सचे हफ्ते माफ किंवा त्यामध्ये मुदतवाढ मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांना मागणी केली होती. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार यांना बँक व फायनान्सच्या हफ्ते माफ किंवा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावे याबाबत निवेदनाव्दारे मागणी केली.