कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना आर्थिक व अन्य मदत मदत पुरविण्यात यावे - डाॅ. नीलम गोऱ्हे

27 Mar 2020 21:01:25
मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनमुळे कामगारांना आर्थिक व अन्य मदत करण्याची अवश्यकता निर्माण झालेली आहे. याबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी आज याविषयी कामगारांचे अडचणी लक्षात घेऊन, या बाबतीत रोजगाराअभावी पुढील काळात जगणेसाठी त्यांच्यासाठी या संदर्भात केंद्र शासनाने जाहीर केलेला १५ हजार पेक्षा कमी पगारदारांचा EPF केंद्र शासन भरणार असले तरी थोडाफार बोजा कमी होण्यापलीकडे दिलासा मिळणार नाही. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना अन्न कल्याण योजनेत १० किलो गहू, १० किलो तांदूळ, १ किलो डाळ मिळणार आहे परंतु त्यातील असंघटित कामगारांसाठी तात्काळ अर्थसहाय्यच्या योजना करणे आवश्यक आहे .

Nilam Gorhe_1   
या अनुषंगाने बांधकाम व असंघटित कामगारांसाठी तातडीने अर्थसहाय्यच्या योजना आखण्यात याव्यात. तसेच सध्या स्थितीत सर्व कामे बंद असल्याने सर्व बांधकाम कामगार,वीटभट्टी मजुर ,बेरोजगार घरकामगार त्यांच्या निर्वाहा साठी रु. ३००० इतके अनुदान डिबीटी मार्फत देण्यात यावे. तसेच सर्व कामगारांना या योजनांविषयक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर कक्ष कार्यान्वित करून समाज माध्यमांद्वारे त्यांचेपर्यंत पोचविण्यात याव्यात. असे आज ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी ना.श्री. दिलीप वळसे-पाटील, कामगार मंत्री यांना निवेदनाद्वारे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना आर्थिक व अन्य मदत मदत पुरविण्यात यावे, ना.डाॅ. नीलम गोऱ्हे, यांनी विनंती केली.
Powered By Sangraha 9.0