पुन्हा पानीपत होऊ दयायचे नाही

प्रदिप पवार    27-Mar-2020
Total Views |
Corona 021_1  H
 
"संयम म्हणजे काय..? युध्द कोरोना विरुद्ध..
का झाला आहे.अद्बालीचे आक्रमनही उत्तरेकडूनच होते.त्यावेळी दिल्लीवर सत्ता होती मराठयांची,याचाच अर्थ महाराष्ट्रावरच आक्रमन होते.
आजही कोरोनाने उत्तरेकडूनच हल्ला तोही प्रथम महाराष्ट्रावरच केला आहे.
त्यामुळे लक्षात ठेवा
पुन्हा पानीपत होऊ दयायचे नाही
 
प्रचंड मोठया विजयाच्या
अगदी फार फार नजदीक आहोत.
अमेरिका = २१ जानेवारी ते आज
म्हणजे दोन महिन्यात
६८हजार कोरोना केसेस
इटली = २ महिन्यात
७४हजार केसेस
स्पेन = २ महिन्यात
४९हजार केसेस
जर्मनी = २ महिन्यात
३७ हजार केसेस
इराण = दिड महिन्यात
२७ हजार केसेस
जगात टोटल ६ लाख केसेस,
अन दिवसाला लाखावर वाढतायत...
 
थोडक्यात
१फेब्रुवारी ते आज
या दोन महिन्याच्या काळात जगातल्या अनेक बलाढ्य देशात सरासरी ५० हजाराच्या वर active कोरोना संसर्गाच्या केसेस आहेत आणि हजारावर लोक मेले आहेत...
असं असताना भारतात मात्र पहिली केस इतर देशांसारखी ३१ जानेवारीलाच सापडून देखील, आज दोन महिन्यानंतरही हा आकडा फक्त ८०० च्या घरात आहे. आणि मृत्यू १२ आहेत..
आपला देश,आपण सर्व भारतीय कोरोना विजया पासून अगदी जवळ आहे.
इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे धोका जास्त असतानाही, लोकसंख्या म्हणा, हायजीन म्हणा, पोपुलेशन डेन्सीटी म्हणा, ८४ हजारामागे एकच व्हेंटिलेटर असताना - अशा सगळ्या गोष्टी विरोधात असतानाही एवढ्या कमी केसेस असणं हे काय आहे? जादू का???
नाही ही जादू नाही. ही आहे तुमच्या सर्वांची कमाल...! कारण तुम्ही वेळोवेळी सगळी काळजी घेताय, अगदी हात धुण्यापासून, ते बाहेर जात नाहीयेत, धैर्य टिकवून आहात, एकमेकांशी कमीत कमी संपर्क ठेवताय, सरकारचं ऐकताय, ९८ टक्के जनता आज घरात आहे, वगैरे अनेक गोष्टी..
इतकी शिस्त दुसऱ्या कोणत्याही देशाला अजून दाखवता आलेली नाही... म्हणूनच हा फरक असावा कदाचित...
पानीपतावर विजयाने युद्धाचा शेवटच होणार होता.दुपारच्या तीन वाजेपर्यंत मराठा सैन्य विजयी घोडदौड करत होते.आपला विजयी तोफखाना धडाधडा दारू ओकत होता.विजयी होत आहोत या जोशात काही बुजुर्ग पराक्रमी मंडळींना वाटले.आजकालची पोरं पुढं चालली आहेत.आपण तर बाजीरावच्या काळात हातावर कणिस घेवून लढाया केल्या.आपण माघं राहाता कामा नये.आपल्या सैन्याने आपल्याच तोफखान्यापुढे आघाडी घेतली.आपला तोफखाना बंद करावा लागला.कारण त्यात आपलीच माणसं मरू लागली.शत्रूने याच संधीचा फायदा घेतला.त्यांचा तोफखाना सुरू झाला.हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हातातून निसटला.संपूर्ण पराभव झाला.आजही पानीपत हा शद्ब पराभवाचा समानार्थी शद्व म्हणून वापरतात.
त्यामुळे लक्षात ठेवा
आता हा येईल तो आठवडा अगदी खूप महत्वाचा आहे. घरात राहा, सुरक्षित राहा... कुटुंबाला तुमची गरज आहे.!!
आपल्याला कोरोना या परदेशी आक्रमनावर विजय मिळवायचा आहे.पुन्हा पानीपत होऊ दयायचे नाही.मनात हा विश्वास ठेवा.
विश्वास...!
आजही विश्वास पानीपतावरच संपला असे म्हटले जाते.तोच विश्वास आपण परत मिळवला आहे.आता त्याला गमवायचे नाही.कोणत्याही किंमतीत गमवायचे नाही.संयम सुटल्यानेच तो गमवला होता.आज संयमानेच त्याला मिळवायचे आहे.

सर्वात महत्वाचं...
हे सगळं संपेल तेव्हा भारत जगासमोर एक प्रचंड मोठी ताकद म्हणून समोर येईल...
खात्रीलायक विश्वास ठेवा...!!!
कोरोना हरेल आपला देश जिंकेल...