शहपूरतील लबाड उद्योजक समीर पारीखचा वेहलोळीचा कारखाना सुरु?

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
शहापूर : तालुक्यातील वासींद जवळच्या वेहलोळी येथील कृष्णा प्रमोशन नावाने समीर पारिख यांची प्लास्टिक उत्पादक कंपनी शासनाच्या सर्व प्रकारच्या बंदी नंतरही तहसीलदार कार्यालयात एक पत्र दिले म्हणून चालू ठेवले आहे. या कंपनीमध्ये आज रोजी पर्यंत पंचवीस-तीस कामगार काम करीत आहेत, मात्र या कंपनीवर अद्याप कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही.परंतु या कारखान्यात कोरोनाव्हायरस बाबत कोणती काळजी घेतली जात असेल म्हणून यांना सूट देण्यात आली आहे. असे सर्वत्र चर्चिले जात आहे.

samir 0_1  H x  
 
शहापूर तालुक्यात अनधिकृत बांधकामे करून आपला उद्योग चालवणारा कृष्णा प्रमोशन चा मालक समिर परिख यांचे भल्याभल्यांशी लागेबांधे असून त्यांनी तालुक्यातील सर्वांनाच खिशात घातल्याचा दम तो जाहीरपणे देत असतो. माझा कोणी वाकड करणार नाही, अशी गुर्मी असलेला समीर पारिख आज जगात सुरू असलेल्या लॉक डाऊन चा आदेश न पाळता आपली कंपनी चालवत आहे.
 
samir 01_1  H x
 
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने बंदी आदेश न पाळणारा हा पारीख ला आशीर्वाद कोणाचा आहे, त्यामुळे वेहलोळी गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अनेक बाहेरून येत आहेत. यावर कोणती उपाय योजना प्रशासकीय यंत्रणा करते याची जनदूत टीम वाट पाहत आहे. याबाबत अधिक माहिती साठी ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.