जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल विक्री बंद करणार - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
सोलापूर : सद्यपरिस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि कोरोना विषाणूचे संसर्ग रोखणे करता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.संक्रमण एका व्यक्तीपासून अनेकांना होत असते. पेट्रोल -डिझेल पंपावर दुचाकी चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. जिल्ह्यातील कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी पेट्रोल-डिझेल विक्री आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
 
Milind_1  H x W
 
आदेशामधून यांना वगळले…
जीवनावश्यक वस्तू उदा- अन्नधान्य, भाजीपाला, फळे मांस, विक्री केंद्रे, किराणा, दूध,पाणी, गॅस इत्यादी यांचा पुरवठा करणारी वाहने
अत्यावश्यक सेवा (औषधे, रुग्णालये, आरोग्य, कीड नियंत्रण विषयक सुविधा, वस्तू व कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनी, कारखाने, उद्योग /व्यवसाय इत्यादी यांचा पुरवठा करणारी वाहने
सर्व वैद्यकीय सेवा करणारे खाजगी, शासकीय डॉक्टर्स, कर्मचारी कायदेशीर सेवा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने
कोरोना नियंत्रण व निर्मूलन कार्य करणाऱ्या शासकीय खाजगी वाहने
सर्व शासकीय वाहने
वैद्यकीय उपचार व सहाय्याची गरज असणारी व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई केली जाईल असाही इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.