आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रा. आ. केंद्रांसाठी 500 सॅनिटायझर चे वितरण

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच अन्य काही रुग्णालयात सॅनिटायझरचा अभाव असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूर जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तसेच बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर उपलब्ध केले आहे.
 
Sudhir_Mungantiwar_1 
 
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत यांना मनपा सदस्य श्री सुभाष कासनगोट्टूवार, दत्तप्रसन्न महादाणी, उज्वल धामनगे यांनी ५०० मी.ली च्या ३००० सॅनिटायझर बॉटल्स सुपूर्द केल्या .
त्याचप्रमाणे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय ५०० मी.ली च्या १०० सॅनिटायझर बॉटल्स भाजप पदाधिकाऱ्यांनी वितरित केल्या. यावेळी बल्लारपूर शहरातील किराणा दुकानात व भाजी विक्रेत्यांना सुद्धा सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले. यावेळी बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, काशी सिंह, राजू गुंडेट, विकी दुपारे, दत्तपसन्न महादाणी, उज्वल धामनगे, मनोज पोतराजे, आशिष ताजने यांची उपस्थिती होती.
 
याधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ५०० सॅनिटायझर, तसेच बल्लारपूर व चंद्रपूर शहरातील किराणा दुकान, भाजी व फळ विक्रेते यांना ५०० सॅनिटायझर वितरीत केले आहे. या सॅनिटायझर च्या माध्यमातून आ. मुनगंटीवार यांनी रुग्णालयांसाठी उत्तम सोय उपलब्ध केल्याचे सांगत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गहलोत यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले.