सोलापुरात सॅनिटायझरच्या १०० बाटल्या जप्त

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर येथील कार्यालयाने उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक नमूद नसलेल्या १०० बाटल्या सॅनिटायझर जप्त केल्या.
 
sanitizer_1  H
 
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भु.पो. पाटील यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कोठारी सेल्स कार्पोरेशन मंगळवार पेठ, सोलापूर येथे तपासणी केली असता नाकोडा कंपनीचे हॅन्ड सॅनिटायझर विक्री करता उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. मात्र बाटलीवर उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक नमूद नसल्याने १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्यांची किंमत सुमारे ९५०० रुपये आहे.औषध निरीक्षक सु.श. जैन यांनी कारवाई केली.
 
याबाबत पुढील तपास व कार्यवाही सुरु आहे.औषध विक्रेत्यांनी माक्स सॅनिटायझर यांची साठेबाजी, जादा दराने विक्री करु नये.असे केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल असे पाटील यांनी नमूद केले आहे.अन्न व औषध प्रशासनातर्फे ६८ औषध दुकानांच्या याबाबत आतापर्यंत तपासण्या करण्यात आल्या आहेत.