मोहोळच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी शौकत तलफदार यांची निवड होणार

जनदूत टिम    26-Mar-2020
Total Views |
सोलापूर : मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सरिता सुरवसे चा अखेर राजीनामा मंजूर झाला असून उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांचा राजीनामा नामंजूर झाल्याने आता पुढील आदेश येईपर्यंत मोहोळचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून विद्यमान उपनगराध्यक्ष शौकत तलफदार त्यांची नेमणूक होणार आहे.

Shaukat_1  H x
 
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुका होऊन चार वर्षे संपत आहे. सध्याच्या अडीच वर्षासाठी नगर परिषच्या नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला राखीव आहे. या पदावर नगराध्यक्षा म्हणून वंदना संतोष सुरवसे यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे शौकतभाई तलफदार तर राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य म्हणून रुपेश उर्फ कुंदन धोत्रे यांची निवड राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील आणि लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी एकमताने केली होती. यामध्ये आपला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे नगराध्यक्ष वंदना सुरवसे यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता तो राजीनामा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला आहे.