गुढीपाडव्याचं एक निसर्गानुरूप नामकरण केलंय ते चैत्रपाडवा या लोभस नावानं

जनदूत टिम    25-Mar-2020
Total Views |
ऋतूचक्राने हळूवार कूस पालटल्यावर नवचैतन्याची चाहूल वास्तुपुरुषाला लागलीय. आम्रमंजिऱ्यांचा हवाहवासा वाटणारा गंध नि रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षांचं पुष्पवैभव यांनी वास्तुपुरुषाच्या अंतर्यामी आनंदलहरी उत्पन्न केल्यात. काहीतरी शुभंकर नि सर्जनसंपन्न घडणार असल्याची तेजस्वी चमक वास्तुपुरुषाच्या भिंतींवर दिसू लागलीय. त्यानं आपल्या मनाच्या खिडक्या उघडल्याहेत त्या नव्या ऋ तूचं स्वागतगीत गाणाऱ्या पाखरांसाठी; नि त्यानं खुलं केलं आहे त्याच्या अस्तित्वाचं प्राचीन सागवानी प्रवेशद्वार शुभ-शकुनांची सुचिन्ह आपल्या देहावर रेखांकित करून घेण्यासाठी.. ही कसली लगबग? ही कसली उत्कंठा या वास्तुपुरुषाची? प्रश्न जितका सोपा तितकं उत्तरही.. विश्वव्युत्पत्तीच्या गाभ्यातून मोहरून चैत्राच्या नि पर्यायाने विश्वाची नांदी झाली त्या आदिम क्षणांचा साक्षीदार असलेल्या चैत्रपाडव्यासाठीच या वास्तुपुरुषाची ही घरंदाज आतुरता.

Gudi-Padwa_1  H
 
चैत्राची चाहूल म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी.. वृक्ष-वेलींच्या, रानपाखरांच्या, पशुधनाच्या नि मानवी जीवनाच्याही तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्यस्रोताचा हा उगम. या उगमापाशी वास्तुपुरुषांचं मन अनादी काळापासून रेंगाळतंय.. चैत्रचाहुलीच्या आनंदानं उधाणलेल्या स्त्रियांनी वास्तुपुरुषाच्या बारूपावर म्हणजेच भिंतींवर, दारांवर, उंबरठय़ावर नि खिडक्यांवर चैत्रांकित खुणा रेखल्याहेत. वास्तुपुरुषाच्या अंगणात गोपद्म, शंख-चक्र, कूर्म, कमलदलांच्या रांगोळ्या घातल्या जातायत नि त्यात रंग भरले गेलेत ते मानवी जीवनातील भावभावनांचे. वास्तुपुरुषाच्या अभिमानी कौलारू माथ्यावर काष्ठशलाकेवर रेशीमवस्त्र गुंडाळून त्यावर उभारली गेलीय विजयाची गुढी. 
हिंदू शालिवाहन शकाचा हा प्रारंभ बिंदू. हिंदू समाज-संस्कृतीच्या परिघावरल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवसाची वास्तुपुरुषाला असलेली युगानुयुगीची ओढ खरंच अनन्यसाधारण. शालिवाहन शकारंभ (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) भारतवर्षांत ‘नूतन वर्षांरंभ’ झाल्याची खूणगाठही वास्तुपुरुषानं मनाशी बांधलीय. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि लंकाविषयानंतर श्रीरामाचा अयोध्यानगरीत प्रवेश झाला तोच हा दिवस नि शेषशायी विष्णूच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवानं विश्वाची- सृष्टीची निर्मिती केली तोही हाच दिवस! याच कारणास्तव वास्तुपुरुषाचं मन आभाळानुगामी झालंयं नि त्याच्या प्रतीकात्मक अभिव्यक्तीसाठी वास्तुपुरुषाच्या शिरोभागी काष्ठशलाकेच्या अग्रभागावर तलम झळाळते रेशीमवस्त्र गुंडाळून त्यावर चांदीचा-पितळेचा गढू पालथा घालून, त्याच्याभोवती पुष्पगंधित माळा गुंफून उभारली जातेयं ती संस्कृतीच्या उन्नयनाची गुढी.. याच संस्कृतिसंचिताला वास्तुपुरुषानं संबोधलंय ‘गुढीपाडवा’.
वास्तुपुरुषाच्या आदिम ऋ णानुबंधांविषयी जिव्हाळा दर्शविण्याचा हाच शुभदिन.. भारतीय संस्कृती-परंपरेनं या गुढीपाडव्याचं एक निसर्गानुरूप नामकरण केलंय ते चैत्रपाडवा या लोभस नावानं. चैत्राची चाहूल म्हणजे वसंत ऋ तूच्या आगमनाची वर्दी.. वृक्ष-वेलींच्या, रानपाखरांच्या, पशुधनाच्या नि मानवी जीवनाच्याही तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्यस्रोताचा हा उगम. या उगमापाशी वास्तुपुरुषांचं मन अनादी काळापासून रेंगाळतंय.. चैत्रचाहुलीने आनंदून गेलेल्या स्त्रियांनी वास्तुपुरुषाच्या बारूपावर म्हणजेच भिंतींवर, दारांवर, उंबरठय़ावर नि खिडक्यांवर चैत्रांकित खुणा रेखल्याहेत. वास्तुपुरुषाच्या अंगणात गोपद्म, शंख-चक्र, कूर्म, कमलदलांच्या रांगोळ्या घातल्या जातायत नि त्यात रंग भरले गेलेत ते मानवी जीवनातील भावभावनांचे. वास्तुपुरुषाच्या अभिमानी कौलारू माथ्यावर काष्ठशलाकेवर रेशीमवस्त्र गुंडाळून त्यावर उभारली गेलीय विजयाची गुढी. निसर्गाच्या रंग-रूप-गंध-नाद-स्पर्शाबाबतची शालीनता वास्तुपुरुषाच्या अंतरंगी जपली गेलीय. मानवी आरोग्यबल-बुद्धी-तेजस्विता नि सर्जनशीलता यांच्या वृद्धीसाठी वास्तुपुरुषाच्या साक्षीने सेवन केलं जातंय ते कडुनिंबाच्या रसात मिरे, हिंग, लवण, जिरे नि ओवा मिसळून तयार केलेल्या जीवनरसाचं. याच जीवनरसामुळे मानवी शरीराला पर्यायाने वास्तुपुरुषालाही मिळालीय ती रसरशीत ऊर्जा. याच ऊर्जेचं एक अदिम केंद्र आहे ते वास्तुपुरुषाच्या रसेंद्रियात.
भारतीय साहित्यविश्वातही या चैत्रपाडव्याच्या स्वागताची शब्दसाधना केलेली वास्तुपुरुषाला स्मरतेय. त्याच्या सागवानी दारावर केशरी-पिवळ्या झेंडूमध्ये गुंफलेल्या आम्रपर्णाचं तजेलदार तोरण बांधलेलं पाहून त्यांच्या ओठांवर आलेयत ते ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचे-
 
‘‘बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले’’
 
हे चैत्रपाडव्याचे आनंदऋ ण अभिव्यक्त करणारे शब्दच.. चैत्राच्या आगमनाशी आतून नातं आहे ते वसंत ऋ तूच्या आगमनाचं.. वसंत हा स्वत:च वैभवसंपन्न ऋ तूराज.. वृक्षाचे पुष्परंग उधळणारा, मानवी जीवनात चैतन्य निर्माण करणारा नि सर्जनशील कवी-कवयित्रींच्या नेणिवेतील चैत्र जाणिवांना मूर्त शब्दरूप देणारा ऋ तूराज वसंत.. वास्तुपुरुषालाही याची जाण आहे ती अभिजात जातकुळीची.. कदाचित म्हणूनच वास्तुपुरुषाला इथे आठवताहेत त्या कवी ग्रेस यांच्या-
 
‘‘अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे हृदय स्पंदनांचा झरा’’
 
या अत्यंत शालीन प्रेमभावना वसंतातल्या घनगच्च घमघमत्या मोगऱ्याच्या प्रतीकातून अभिव्यक्त करणाऱ्या ओळीसुद्धा. चैत्रांकित पाडव्याच्या या बहुआयामीत्वानं वास्तुपुरुष भारावून गेलाय. मानवी जीवनाच्या संस्कृतीसंचिताचं प्रकटीकरण ज्या गुढी-तोरणांच्या चिन्हांकित स्वरूपातून झालंय ते केवळ ललामभूत ठरत असल्याचं वास्तुपुरुषाला मनोमन जाणवतंय. चैत्रजाणिवांचा एक आम्रगंधी मोहोर त्याच्या घर – भिंतींमध्ये दरवळू लागलाय. त्याच्या अंगाखांद्यावर पोसल्या गेलेल्या पिढय़ान्पिढय़ांची संपन्नता वास्तुपुरुषानं चैत्रपाडव्याला अधिक संपृक्त केलीय नि विश्वाच्या अखेरच्या क्षणापर्यंत कालौघात ती अधिक चैत्रलाघवी होत जाणार आहे..!