दररोज काम करून हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मजुरी दया

किरण निचिते    24-Mar-2020
Total Views |

संचारबंदी मध्ये गरीब कष्टकर्‍यांना शिव भोजनाची सोय करा

असंघटित कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालकांना द्यावेत

 

worker_1  H x W
 
ठाणे - मुंबईच्या कारखानदारीच्या उद्योग नगरीत दैनंदिन काम करून हातावर पोट असणाऱ्या असंघटित गरीब मजुरांना सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावा विरोधात आणलेल्या संचारबंदी मध्ये या कुटुंबाची चूल पेटणार कशी असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी संचारबंदी मध्ये या गरीब कष्टकर्‍यांना शिव भोजनाची सोय करावी अशी मागणी होत आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये भाईंदर, पनवेल, वसई विरार सोडले तर बऱ्यापैकी शिवसेनाच सत्तेमध्ये आहे याच क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या मजुरांचे वास्तव्य आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संबंधित आस्थापनांच्या मालकांना तशा प्रकारच्या सूचना देऊन त्या त्या शहरातील त्या ठिकाणच्या मजूर कष्टकरी वर्गाला ऍडव्हान्स मध्ये एक महिन्याचा पगार या आठवड्यात देण्याची सोय करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.

ठाणे - पालघर आणि रायगड जिल्ह्यासह मुंबई उपनगर जिल्ह्यात अशाप्रकारे रोजंदारीवर काम करणारे नाका कामगार, घर काम करणारे कामगार तसेच कचरा वेचक आणि अन्य हमाल वर्ग तसेच अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संचारबंदी मुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. गरिबाला मोठ्या दुकानांमध्ये जाणे सुद्धा परवडणार नाही. मुळात या गरीब कुटुंबाची खरेदी सुद्धा कमी किमतीची असते त्यांना मोठ्या दुकानात घुसण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे नाक्या-नाक्यावर गरिबांची दुकाने ही जास्तवेळ खुले ठेवावे अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
 
Tata_1  H x W:
 
आयुष्यभर कोणत्याही ओळ्खपत्राशिवाय जीवन जगणाऱ्या या मजूर वर्गाला सार्वजनिक ठिकाणी प्रवासात आधारकार्ड सोडले तर कोणती ओळख आज हातात नसेल. त्याचवेळी त्यांना कोणी अडवले तर त्यांच्याकडे साधा फोन सुद्धा नसेल तेव्हा प्रवासासाठी गरिबाला मोकळीक असावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. जेणेकरून ते त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी जाऊन योग्य ती उधार - उसनवारी करून ऍडव्हान्स रक्कम घेऊन आपल्या कुटुंबाचे पुढील दहा दिवसाचा रेशन पाण्याचा प्रश्न सोडू शकते अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. चतुर्थश्रेणी च्या खालच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मालक लोकांनी एक महिन्याचा वाढीव पगार देण्याची सोय करावी असे शासनाने आदेश राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देणे गरजेचे आहेत.