साने पाली मध्ये कुत्र्यांचा हौदास

अविनाश जाधव    24-Mar-2020
Total Views |
 
kutta _1  H x W
 
वासिंद : साने पाली गावामध्ये एक कुत्र्यास वेड लागले असून हा कुत्रा गावामध्ये राजरोस पणे हिंडत असून गावामध्ये असणाऱ्या अनेक स्रिया व लहान मुलांना यांना चावा घेऊन गंभीर स्वरूपाची जखमी केले आहे या कुत्र्याच्या चावा घेतल्यानंतर तातडीने जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा आरोग्य केंद्र शहापूर येथे जखमींना घेऊन गेले असता तेथील डॉक्टर यांच्याकडून लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.  यावरून प्रशासन किती जागरूक आहे याचे दर्शन होते. जखमींना उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. लस उपलब्ध नाही म्हणजे यावरून नागरिकांची जीवाशी खेळ केला जात आहे. यावरून दिसून येत आहे तसेच या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांची प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याच बरोबर कोरोना (COVID -19) या विषाणू चा प्रादुर्भाव तर आहेच या सर्व परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Dog